शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात सलाईन बंद; ‘बाटली’ चालू !

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

मद्यपींचा राबता : कुठरेत डॉक्टरअभावी रूग्णालय बंद, ग्रामस्थांची गैरसोय

बाळासाहेब रोडे - सणबूरपाटण तालुक्यतील कुठरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाच वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने बंद स्थितीत आहे़ उपकेंद्र कशामुळे बंद झाले, याचे कारण अद्याप ग्रामस्थांना कळालेच नाही. सुमारे २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावांतर्गत सुपुगडेवाडी, लोकरेवाडी, बादेवाडी, वाझोली, मोरेवाडी, पवारवाडी, मोळावडेवाडी, पागेवाडी, कदमवाडी या गावांचा समावेश आहे़ मात्र, उपकेंद्र बंद असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. कुठरे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या गावातील लोकांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक उपकेंद्र हे सोयीचे ठिकाण होते़ परंतु, पाच वर्षांपासून येथील उपकेंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे़ साथीचे रोग, विविध प्रकारच्या लसीकरण मोहीम यासाठी काळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या ठिकाणी येवून तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार करत होते़ परिसरातील व्यक्ती आजारी पडली तर तिला उपचारासाठी तळमावले अथवा धामणी येथील खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे़शासनाने उपकेंद्रासाठी मोठया प्रमाणात निधी खर्च करून सर्व सुविधा दिल्या मग डॉक्टर का येत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा रहात आहे़ उपकेंद्र बंद असल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतच आहे शिवाय दिवस वाया जात आहे़उपकेंद्राच्या इमारतीमध्ये अद्ययावत साहीत्य असून दवाखाना बंद असल्याने साहित्य व औषधे धूळ खात पडली आहेत़ परिणामी गावातील तळीरामांनी इमारतीचा आडोसा आपला अड्डाच बनवला आहे़ त्यामुळे या ठिकाणी दारूच्या रिकाम्या व फुटलेल्या बाटल्या दिसत आहेत़ उपकेंद्र ‘असुन अडचण, नसून खोळंबा’ अशा परीस्थितीत आहे़ उपकेंद्र सुरू होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली; पण याबाबत सकारात्मक उत्तरे अजून मिळाली नाहीत़