सोडली नोकरी बनला सनदी अधिकारी; उंडाळेच्या साईराज पाटील यांची यूपीएससीत ५४५ वी रँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:08 IST2026-03-07T13:08:35+5:302026-03-07T13:08:54+5:30

आयआयटी बॉम्बे येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसमध्ये नोकरीही केली.

Sairaj Panditrao Patil from Undale in Satara district secured 545th rank in the Union Public Service Commission examination | सोडली नोकरी बनला सनदी अधिकारी; उंडाळेच्या साईराज पाटील यांची यूपीएससीत ५४५ वी रँक

सोडली नोकरी बनला सनदी अधिकारी; उंडाळेच्या साईराज पाटील यांची यूपीएससीत ५४५ वी रँक

प्रसाद पाटील

उंडाळे : येथील साईराज पंडितराव पाटील यांनी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत ऑल इंडिया ५४५ वी रँक मिळवली आहे. ग्रामीण भागातून मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून त्यांच्या या यशाबद्दल काैतुक हाेत आहे.

साईराज पाटील यांचे वडील पंडितराव दिनकर पाटील हे सध्या पाटण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत, तर आई जयश्री पंडितराव पाटील या माध्यमिक शिक्षिका आहेत. साईराज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण त्यांनी पुणे येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. 

पदवी पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसमध्ये नोकरीही केली. मात्र प्रशासनात जाऊन समाजासाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे २०२१ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीची तयारी सुरू केली. २०२४ व २०२५ या दोन्ही वर्षांत त्यांनी मेन्स परीक्षा दिली होती. यंदाच्या चौथ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले.

रोज सातत्याने सहा ते आठ तास अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. प्रिलिम्सपूर्वी ऑप्शनल विषय पूर्ण केला. त्यानंतर विविध टेस्ट सिरीज दिल्या. मित्रांबरोबर चर्चा केल्या तसेच कॉलेजमधील सीनियर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेतले. या सर्व गोष्टींचा तयारीत मोठा फायदा झाला. या प्रवासात आई-वडील तसेच बहिणींनेही माेठा पाठिंबा दिला. -साईराज पाटील
 

आमच्या गावातील माजी जिल्हाधिकारी दिवंगत दिनकरराव पाटील यांच्या प्रेरणेने मुलाला प्रशासनात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज मुलाने यूपीएससीत यश मिळवून आमचे स्वप्न पूर्ण केले. आमची दोन्ही मुले समाजासाठी काम करतील याचे आम्हाला समाधान वाटते. - पंडितराव पाटील, वडील, नायब तहसीलदार पाटण

Web Title : नौकरी छोड़ी, बने आईएएस: उंडाले के साईराज पाटिल ने यूपीएससी में रैंक हासिल की

Web Summary : उंडाले के साईराज पाटिल ने सामाजिक न्याय मंत्रालय में नौकरी छोड़ने के बाद यूपीएससी 2025 में 545वां रैंक हासिल किया। आईआईटी बॉम्बे से सिविल इंजीनियरिंग की डिग्री के साथ, उन्होंने समाज सेवा के अपने सपने को पूरा करते हुए यूपीएससी की तैयारी के लिए खुद को समर्पित कर दिया।

Web Title : From Job to IAS: Undale's Sairaj Patil Secures UPSC Rank

Web Summary : Sairaj Patil from Undale achieved 545th rank in UPSC 2025, after leaving his job at the Ministry of Social Justice. With a civil engineering degree from IIT Bombay, he dedicated himself to UPSC preparation, fulfilling his dream of serving society.