शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वजराई धबधब्यासाठी रस्सीखेच

By admin | Updated: August 1, 2016 00:40 IST

सरपंचाचा आरोप : ‘कास वजराई धबधबा’ नावाचा फलक लावून फसवणूक

सातारा : देशातील सर्वात उंच असलेल्या वजराई धबधब्यासाठी कास आणि भांबवली ग्रामस्थांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कास मंदिराजवळ ‘कास वजराई धबधबा’ असा फलक लावून पर्यटकांची फसवणूक झाल्याचा आरोप भांबवलीच्या सरपंच नवाबाई मोरे यांनी केला आहे. त्यामुळे हा धबधबा नक्की कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्लक्षित निसर्ग अचानक भरघोस कमाई करून देऊ लागल्यानंतर माणसांमध्ये येणारे ‘भांबवलेपण साताऱ्याच्या पश्चिमेकडे दिसू लागले आहे. देशातील सर्वांत उंच वजराई धबधबा कोणाच्या हद्दीत हा वाद उफाळला आहे. या संदर्भात भांबवलीच्या सरपंच नवाबाई मोरे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, कास येथील काही ग्रामस्थांनी ‘कास वजराई धबधबा’ या नावाचा अनधिकृत फलक कास मंदिराजवळ लावून पर्यटकांची फसवणूक चालविली आहे. धबधबा दाखविण्याच्या नावाखाली विनापावत्या पर्यटकांकडून पैसे लुबाडले जात आहेत. कास-भांबवली परिसरात भविष्यात उद्भविणारा वाद संपवण्यासाठी तसेच सौहार्दपूर्ण आणि शांततामय संबंध राहण्यासाठी कास येथील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामस्थांवर शासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. पर्यटकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) नाव वापरण्यास कायमची बंदी घाला सातारा वनखात्याच्या नोंदीप्रमाणे भांबवली वजराई धबधबा हा भांबवली गावच्या हद्दीत येतो. तेव्हा ‘कास वजराई धबधबा’ हे नाव वापरण्यास कायमची बंदी घालावी, अशी मागणीही मोरे यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.