जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामीण राजकारण ढवळून निघालं आहे. याच दरम्यान सातारा जिल्ह्यात निवडणुकीला गालबोट लावणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या पाल गटात भाजपा उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली.
बाळासाहेब साळुंखे चोरेकर हे देवदर्शनावरून परत येत होते, त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनी सांगितले की, हल्लेखोर इनोव्हा गाडीतून आले होते. त्यांनी आमची गाडी अडवली आणि मारहाण केली.
पाल जिल्हा परिषद गटातील वर्चस्वावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरेकर यांना मारहाण झाल्याची माहिती कळताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले.
राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. ७ फेब्रुवारी रोजी मतदान असताना या घटनेमुळे पोलिसी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Web Summary : Ahead of local elections in Satara, a NCP leader was allegedly attacked by the brother of a BJP candidate. Tensions are high; police presence has increased. The incident is under investigation.
Web Summary : सतारा में स्थानीय चुनावों से पहले, एक एनसीपी नेता पर कथित तौर पर भाजपा उम्मीदवार के भाई ने हमला किया। तनाव चरम पर है; पुलिस बल बढ़ाया गया है। घटना की जांच जारी है।