वरकुटे-मलवडीतील रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 04:23 PM2020-09-28T16:23:19+5:302020-09-28T16:24:42+5:30

वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरातवाडी, पोळवस्ती, फडतरेवस्ती, इनामदारवस्तीवरील नागरिकांचा गावाकडे ये-जा करण्याचा संपर्क तुटला आहे.

The road from Varakute-Malwadi was carried away | वरकुटे-मलवडीतील रस्ता गेला वाहून

वरकुटे-मलवडीतील रस्ता गेला वाहून

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या आठवड्यात पाऊस : वरकुटे-मलवडीतील रस्ता गेला वाहून खरातवाडीसह फडतरवाडी, इनामदारवस्तीचा संपर्क तुटला

वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरातवाडी, पोळवस्ती, फडतरेवस्ती, इनामदारवस्तीवरील नागरिकांचा गावाकडे ये-जा करण्याचा संपर्क तुटला आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी वरकुटे-मलवडी परिसरात धुवाँधार झालेल्या पावसाने बाजरी, ऊस, मका पिकांसह तरकारी भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्याकाठच्या परिसरातील शेतीचे बांधाखालील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्याजागची जमीन खचली आहे.

वरकुटे-मलवडी ते खरातवाडी रस्त्यावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरात पोळवस्तीजवळचा पूल वाहून गेला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या या पुलाचे कच्चे बांधकाम गेल्या वर्षांपूर्वीच करण्यात आले होते.

कृषी विभागाच्या वतीने या ओढ्यावर बांधण्यात आलेल्या साखळी बंधाऱ्यातील पाणी पुलाच्यावरपर्यंत साठून राहत होते. त्यातच मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्याने हा पूल वाहून गेल्याने खरातवाडी परिसरातील वास्तव्यास असणाºया नागरिकांची गैरसोय झाली आहे.

Web Title: The road from Varakute-Malwadi was carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.