On the road tomatoes due to the rate of five rupees kg; Farmers are worried about the cost of production | पाच रुपये किलो दरामुळे टोमॅटो रस्त्यावर; उत्पादनाचा खर्चही निघेना, शेतकरी चिंतेत
पाच रुपये किलो दरामुळे टोमॅटो रस्त्यावर; उत्पादनाचा खर्चही निघेना, शेतकरी चिंतेत

सातारा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना त्यातून उभारी घेताच मागील काही दिवसांमध्ये बाजारात टोमॅटोची आवक वाढली. सोमवारी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७० क्विंटल आवक झाल्याने टोमॅटोची तीन ते पाच रुपये किलोने विक्री झाली. बाजारात टोमॅटो आणण्याचा खर्चही न निघाल्याने अंबवडे संमत वाघोली (ता. कोरेगाव, जि.सातारा) येथील एका शेतकºयाने टोमॅटो रस्त्यावर टाकून दिला.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या आपत्तीवर मात करीत काही शेतकºयांनी भाजीपाल्याच्या बागा जगविल्या. काही दिवसापूर्वी टोमॅटोला १५ ते २० रुपये दर मिळत होता; पण ही परिस्थिती जास्त दिवस टिकली नाही. आवक वाढल्याने दर गडगडू लागले. सोमवारी तर दर ३ ते ५ रुपयांवर आले. त्यामुळे उत्पादन खर्च सोडा, साधा वाहतूक आणि हमालीचा खर्चही निघेनासा झाला आहे.

Web Title:  On the road tomatoes due to the rate of five rupees kg; Farmers are worried about the cost of production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.