शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आज ठरणार ‘कऱ्हाड दक्षिण’ची दिशा

By admin | Updated: July 12, 2014 23:47 IST

जखिणवाडी, कऱ्हाडात अनेक बैठका : कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

कऱ्हाड : आगामी विधानसभा निवडणुकीची गणगौळण राज्यभर सुरू झाली आहे. कऱ्हाड दक्षिणही त्याला अपवाद नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात अधिकृत उमेदवार कोण, हे आजतरी सांगता येत नाही; पण जखिणवाडी आणि कऱ्हाडात होणाऱ्या बैठकीत रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यावेळी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुख्यमंत्र्यांची दिशा आज ठरणार, असे मानले जाते. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनी कऱ्हाडच्याच पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत त्यांनी जिल्ह्यासह कऱ्हाडला छप्पर फाडके निधीही दिला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतचे जनतेमधील प्रेम द्विगुणीत झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची खुर्ची डळमळीत करण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत दिल्लीत खलबते झाली आणि त्याची अस्वस्थता कऱ्हाडात पसरली. नेतृत्व बदलाच्या चर्चांना आता मात्र पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढविल्या जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राज्याच्या राजकारणाचा आजवरचा इतिहास पाहता ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या गेल्या. त्यांनी स्वत: विधानसभेची निवडणूक लढविली आहे. तोच अलिखित नियम पृथ्वीराज चव्हाण यांनाही लागू होतो. साहजिकच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल, असे मानले जाते. मग ते ही निवडणूक लढविणार का? कोणत्या मतदारसंघातून लढविणार? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. मात्र, बाबांनी कऱ्हाड दक्षिणेतून लढावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली दिसत नाही.दिवंगत प्रेमलाताई चव्हाण व आनंदराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी बाबा कऱ्हाड दौऱ्यावर आले खरे; पण दक्षिणेवर स्वारी करण्याबाबत त्यांनी या दौऱ्यात ‘ब्र’ शब्दही काढला नाही. रविवार, दि. १३ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा कऱ्हाड दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर जखिणवाडीत सरपंच अ‍ॅड. नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी ११ ते ३ यावेळेत दक्षिणेतील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी मक्का मश्जिदमध्ये इफ्तार पार्टीला हजेरी लावणार आहेत. तर रात्री हॉटेल पंकजला शहरातील विविध व्यापारी असोसिएशन व उद्योजक यांच्याशी चर्चा करून प्रीतीभोजन घेणार आहेत. (प्रतिनिधी)