भरधाव रिक्षाची कारला धडकली; तीन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:57 IST2019-04-21T20:57:27+5:302019-04-21T20:57:44+5:30
नातेवाईकांच्या यात्रेवरून परतताना भरधाव रिक्षा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडकल्याने रिक्षाचालकासह चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.

भरधाव रिक्षाची कारला धडकली; तीन गंभीर जखमी
सातारा : नातेवाईकांच्या यात्रेवरून परतताना भरधाव रिक्षा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडकल्याने रिक्षाचालकासह चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.
विजय शंकर मोरे (वय ४२, रिक्षाचालक रा. कारी, ता. सातारा), श्रावण साहेबराव पवार (वय ३१, रा. आंबळे, ता. सातारा), पिंटू मोतीराम जाधव (वय ३८, रा. आसनगाव, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, परळी भागामध्ये रविवारी यात्रा होती. या यात्रेसाठी हे सर्वजण रिक्षाने तेथे गेले होते. परळीहून कारीकडे जात असताना परळी येथील मंदिराजवळ एक कार उभी होती. या कारला धरधाव रिक्षा समोरून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षाचालक विजय मोरे यांच्यासह श्रावण पवार, पिंटू जाधव, किरण पवार हेही गंभीर जखमी झाले.
या सर्व जखमींना रुग्णवाहिकेने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, किरण पवार हा उपचार न घेताच रुग्णालयातून निघून गेला. इतर तिघांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील पोलिसांनी या तिघांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनी मद्यप्राषन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकारची नोंद सिव्हिलमधील रजिस्टरमध्ये केली आहे.