रिक्षा उलटून दहावीतील विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 10:23 IST2018-04-25T10:23:36+5:302018-04-25T10:23:36+5:30

कुत्रा आडवा आला आणि रिक्षा उलटली

Rickshaw accident at satara, students of class 10th dies | रिक्षा उलटून दहावीतील विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर 

रिक्षा उलटून दहावीतील विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर 

उंडाळे (सातारा)  : कऱ्हाड-चांदोली मार्गावर उंडाळे हद्दीत ॲपे रिक्षा उलटून अपघात झाला. या अपघातात खासगी शिकवणीला निघालेला दहावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू  झाला आहे. तर 5 प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी (25 एप्रिल) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. सुजित संभाजी वीर असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुळसण येथून प्रवासी भरून ॲपे रिक्षा कऱ्हाडच्या दिशेने निघाली होती. रिक्षामध्ये तुळसण येथील रहिवासी सुजित बसला होता. रिक्षामध्ये सुजितसह अन्य प्रवासी होते. 

रिक्षा उंडाळे गावच्या हद्दीत आली असताना वानरांच्या पाठीमागे लागलेली कुत्रे अचानक रिक्षाच्या समोर आले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून रिक्षा उलटली. यात सुजितचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. 
 

Web Title: Rickshaw accident at satara, students of class 10th dies