परतीच्या पावसाने ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 05:16 AM2020-10-31T05:16:29+5:302020-10-31T05:17:08+5:30

Farmer News : राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला

Return rains damage crops on 9 lakh hectares | परतीच्या पावसाने ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास

परतीच्या पावसाने ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास

Next

- दीपक शिंदे  
सातारा : राज्यात या वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी ऑक्टोबरमध्ये परतताना त्याने २६ जिल्ह्यांतील आठ लाख ९५ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील काढणीला आलेली पिके धुऊन नेली. यामध्ये भात, सोयाबीन, कापूस, ऊस, मका, उडीद, केळी आणि भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे पावसाने एका हाताने भरभरून दिले, तर दुसऱ्या हाताने सगळे हिसकावून नेले, अशी स्थिती झाली आहे.

राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला असून, आठ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के तर एका जिल्ह्यातच फक्त ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती चांगली होती. 

खरीपात सर्वाधिक उत्पादन अमरावती विभागात घेण्यात आले असून, ते ३२. ५० टक्के हेक्टरवर आहे. त्यानंतर लातूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि कोकण या विभागांचा क्रमांक लागतो. भात पीक वगळता ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्यांच्या क्षेत्रामध्ये १ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मूग, उडीद, रागी या कडधान्याच्या क्षेत्रामध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याबरोबरच भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन यांचे क्षेत्र वाढले असून, कारळ आणि इतर गळीत क्षेत्र मात्र कमी झाले आहे. कापसाच्या क्षेत्रातदेखील तीन टक्क्यांनी घट झाली असून, उसाचे क्षेत्र तब्बल ७६ टक्क्यांनी वाढले आहे.

जिल्हानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात जिल्हे)
० ते ३५ टक्के      ०
२५ ते ५० टक्के     ०
५० ते ७५ टक्के (१)     नंदुरबार
७५ ते १०० टक्के (८)    रायगड, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.
१०० टक्के पेक्षा जास्त (२५) 
ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम. नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली.

Web Title: Return rains damage crops on 9 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.