शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलला प्रतिसाद

By admin | Updated: October 17, 2014 22:46 IST

नॅनोचे आकर्षण : भरघोस बक्षिसांमुळे खरेदीसाठी पसंती

सातारा : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘दसरा दिवाळी शॉपिंग कार्निव्हल’ला शहरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. खरेदीबरोबरच ‘लकी ड्रॉ’द्वारे मोठमोठी बक्षिसे देण्यात येणार असल्याने या योजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. योजनेतील सहभागी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांनी दसरा-दिवाळीसाठी खरेदी केल्यास त्यांना एक कूपन दिले जाते. या कूपनमधून दिवाळीपूर्वी एक आणि दिवाळीनंतर एक असे दोन लकी ड्रॉ काढण्यात येतात. भाग्यवान विजेत्यांना मोठी बक्षिसे दिली जातात. यावर्षी ‘हेम मोटर्स प्रा. लि.’ यांच्याकडून प्रथम विजेत्या भाग्यवंतास बंपर बक्षीस म्हणून नॅनो कार देण्यात येणार आहे. ‘फिनिक्स’ आटाचक्की आणि वॉटर प्युरीफायर कंपनीने या योजनेचे सहप्रायोजकत्व स्वीकारले आहे. बंपर बक्षिसाव्यतिरिक्त पहिले बक्षिस ३२ इंची एलईडी टीव्ही, दुसरे बक्षीस वॉटर प्युरिफायर (तीन विजेत्यांना), तिसरे बक्षिस आटाचक्की (दोन विजेत्यांना) आणि चौथे बक्षिस १६३ लिटरचा फ्रीज (दोन विजेत्यांना) अशी बक्षिसांची लयलूट असल्यामुळे या योजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडे दिवाळीच्या खरेदीचा ओघ वाढता दिसत आहे. हेम ग्रुप, ‘फिनिक्स’ यांच्या व्यतिरिक्त नंदिनी इलेक्ट्रॉनिक्स, ओम एन्टरप्रायजेस, कोमल इन्फोटेक, एस. कच्छी अँड कंपनी, बालाजी मोबाइल गॅजेट झोन, सोनी कस्टम्स अँड वॉचेस, ओम क्रोकरी आणि हॉटेल राधिका पॅलेस यांच्याकडूनही बक्षिसे प्रायोजित करण्यात आली आहेत. दिवाळीपूर्व लकी ड्रॉसाठी द्वितीय बक्षिस दोन वॉटर प्युरिफायर, तृतीय बक्षिस आटाचक्की आणि चतुर्थ बक्षिसएक १६३ लिटरचा फ्रिज अशी असून, हा ड्रॉ दिवाळीपूर्वी काढण्यात येणार आहे. याखेरीज दिवाळीपूर्व आणि दिवाळीनंतर काढण्यात येणाऱ्या दोन्ही लकी ड्रॉमध्ये प्रत्येकी २०० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी ४०० गिफ्ट हॅम्परची योजना करण्यात आली आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांसाठीही बक्षीसयोजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांमधूनही दिवाळीनंतर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्या भाग्यवान व्यापाऱ्याला लॅपटॉप बक्षिस देण्यात येणार आहे.