कोयना धरणातील साठा ७० टीएमसीच्या जवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 14:20 IST2020-08-07T14:14:12+5:302020-08-07T14:20:15+5:30
पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक होत असून २४ तासांत साठ्यात साडे तीन टीएमसीने वाढ झाली. सकाळी पाणीसाठा ६९.११ टीएमसी ऐवढा झाला होता.

कोयना धरणातील साठा ७० टीएमसीच्या जवळ
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १५०, नवजा १०७ आणि महाबळेश्वरला १४५ मिलीमीटर पाऊस झाला. तर या
पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक होत असून २४ तासांत साठ्यात साडे तीन टीएमसीने वाढ झाली. सकाळी पाणीसाठा ६९.११ टीएमसी ऐवढा झाला होता.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५० तर जूनपासून आतापर्यंत २५६८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला १४५ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर येथे आतापर्यंत २७४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला १०७ तर आतापर्यंत २७९९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक होत आहे.
शुक्रवारी सकाळी कोयना धरणात २०४६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ६९.११ टीएमसी इतका झाला होता.
२४ तासांत धरणसाठ्यात जवळपास साडे तीन टीएमसीने वाढ झाली असून टक्केवारी ६५.६६ टक्के आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.