शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

क-हाडचे लोकप्रतिनिधी यशवंत विचारांचे पाईक !-आबासाहेब पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:13 IST

क-हाड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे आणि त्या तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून मला काम करण्याची मिळालेली संधी, हे मी भाग्य समजतो. - आबासाहेब पवार, गटविकास अधिकारी, क-हाड

ठळक मुद्देउद्दिष्टपूर्तीपेक्षाही जास्त कामावर भर चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद,सातारा

प्रमोद सुकरे ।क-हाड तालुक्याचा आवाका मोठा आहे. येथे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, येथील लोकप्रतिनिधी यशवंत विचारांचे पाईक असल्यामुळे काम सुलभ होतं, असं गटविकास अधिकारी आबासाहेब पवार सांगतात. याविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न : क-हाड पंचायत समिती जिल्ह्यात मोठी आहे. येथे काम करताना काय अनुभव वाटतो?उत्तर : पंचायत समिती तुलनेने मोठी आहे, त्यामुळे येथे कामही जास्त आहे. मात्र, कºहाडचे लोक प्रगल्भ असल्याने काम करताना सुलभच होते. येथील लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक असल्याने त्यांचेही सहकार्य लाभते.

प्रश्न : पंचायत समितीच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना तुम्ही राबविता? त्याला कसे यश मिळते?उत्तर : शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं हेच काम आहे. स्वच्छता अभियान, पंतप्रधान आवास योजना, शेती सुधार योजना, रोजगार हमी योजना, रमाई आवास योजना यांचे दरवर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त काम आम्ही केले आहे. विशेषत: दारिद्र्य निर्मूलनच्या उद्देशाने राबविले जाणारे महाराष्ट्र ग्रामीण जीवनउन्नती अभियान आम्ही प्रभावीपणे राबवत असतो. महिलांना संघटित करून त्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देणे व रोजगार उपलब्ध करून देणे हे काम यातून होते.

प्रश्न : अनेक गावांना पूर्ण वेळ ग्रामसेवक नाहीत. अडचणी येतात.उत्तर : तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. मोठ्या गावांना ही पदे रिक्त नाहीत. १ हजार ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाºया गावांची जबाबदारी नजीकच्या ग्रामविकास अधिकाºयाकडे सोपविण्यात आली आहे. 

बीएएमएस डॉक्टर नियुक्तप्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाºया डॉक्टरांनी तेथेच राहायला हवे. त्यांना तशा सूचना आम्ही केल्या आहेत. पूर्वी तेथे एमबीबीएस डॉक्टर असायचे. पदे रिक्त होती. उपलब्ध डॉक्टरही रजेवर गेल्यानंतर अडचणी व्हायच्या. मात्र, आता प्रत्येक ठिकाणी बीएएमएस डॉक्टर नेमले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी नाहीत. 

अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावेपंचायत समितीच्या मासिक बैठकीला काही अधिकारी गैरहजर असतात. त्यांच्यावर कारवाईची मागणी होते. मात्र, कायदेशीर तरतूद अपुरी आहे. तरीही आम्ही जिल्हाधिकाºयांकडे पत्रव्यवहार केला आहे. अधिकाºयांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.पंचनामे सुरू

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचा दौराही आहे.