शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

दिसला टायर की पळतात रावसाहेब!

By admin | Updated: November 5, 2014 23:42 IST

‘डास हटाव’साठी खटाव तालुक्यात मोहीम

शेखर जाधव - वडूज  -खटाव तालुक्यात डेंग्यूबाबत प्रशासनाने गंभीरपणे हालचाली सुरू केल्या असून नुकतीच तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या दालनात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. वडूज, मायणी येथील पंक्चर दुकानातील टायरमधील साडलेले पाणी ओतून देण्यात आले.या बैठकीस गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी युनुस शेख, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आठवड्यातील ‘बुधवार कोरडा दिवस’ पाळण्यात येणार असून घरातील पाण्याची सर्व भांडी कोरडी करून ठेवावीत, असे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले. गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यात प्रत्येक गावातील गटारे वाहती करण्यासाठी संबंधितांनी सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यासाठी तयारी केल्याची माहिती गटविकास अधिकारी देसाई यांनी दिली. डेंग्यूबाबत सतर्क राहून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्याचे आवाहनही तहसीलदार साळुंखे यांनी केले. टायरमधील पाणी दिले ओतूनवडूज, मायणी येथील पंक्चर काढणाऱ्या दुकानांतील पाण्याने भरलेले टायर ओतून संबंधितांना सूचना देण्यात आल्या. तर तालुक्यातील प्रत्येक गावात या आजारासंदर्भात पूर्ण माहिती देऊन घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती मोहीम सुरू करणार असल्याचेही सांगण्यात आले. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.