शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

रामराजे फलटणमध्ये ‘चेहरा’ बदलणार?

By admin | Updated: September 17, 2014 22:29 IST

सर्वांनाच उत्सुकता : दिगंबर आगवणेंसमोर दीपक चव्हाण यांच्याऐवजी दुसरा उमेदवारही शक्य

नसीर शिकलगार -फलटण  -फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की रामराजे नाईक-निंबाळकर ‘चेहरा’ बदलणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. महायुतीतर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडून दिगंबर आगवणे यांचे नाव पक्के झाल्याचे समजते. दिगंबर आगवणे यांच्याविरुद्ध दीपक चव्हाण असणार की आणखी कोण, याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे.फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. गेल्या वीस वर्षांपासून रामराजेंनी विरोधकांना या मतदारसंघावर वर्चस्व मिळू दिलेले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी आमदार चिमणराव कदम, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील ही काँग्रेसची मंडळी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहिल्याने राष्ट्रवादीने विधानसभा सहज जिंकत युतीचे बाबूराव माने यांचा पराभव केला होता.मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण यांना स्वत:ची वेगळी छाप पाडण्यात फारसे यश आले नाही. विरोधकांनी ‘रबर स्टॅम्प’ म्हणून त्यांच्यावर सतत टीका केली. ही टीका खोडून काढण्यात दीपक चव्हाण यांना अपयश आले. मागील पंचवार्षिक काळात बरोबर असणारी काँग्रेसची मंडळी यावेळी राष्ट्रवादीबरोबर राहणार नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर त्यांच्या सहकार्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजकीय ताकद वाढविली. दररोज रामराजे विरुद्ध रणजितसिंह असा सामना सुरू आहे. रणजितसिंहांनी आघाडीधर्म पाळणार नसल्याचे जाहीर करताना दिगंबर आगवणे यांना पाठबळ दिले आहे. दिगंबर आगवणे यांनी नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. फलटणची जागा ‘स्वाभिमानी’ला मिळावी यासाठी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या चार-पाच दिवसांत सर्वच राजकीय पक्षांना फलटण मतदारसंघाचे चित्र स्पष्ट करावे लागेल.फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे असून, शिवसेनेने तो आम्हाला दिल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत व दिगंबर आगवणे करीत असले, तरी शिवसेनेने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी माजी आमदार बाबुराव माने आणि उद्योजक डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराकडेही सर्वांचे डोळे लागले आहेत.यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याने सर्वांनी अस्तित्वाची निवडणूक केली आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर पूर्णपणे आगवणेंच्या पाठीशी असताना अद्याप हिंदुुराव नाईक-निंबाळकर, माजी आमदार चिमणराव कदम, प्रल्हादराव साळुंखे-पाटील या काँग्रेसच्या नेतेमंडळींनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. तिघेजण एकत्र बसून विधानसभेबाबत निर्णय घेणार असले तरी राष्ट्रवादीला ते साथ देण्याची शक्यता कमी आहे.