शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
2
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
3
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
4
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
5
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
6
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
7
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
8
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
9
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
10
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
11
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
12
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
13
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
14
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
15
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
16
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
17
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
18
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
19
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
20
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: मूळ अपक्षाचं असलं तरी मी 'या' पक्षात राहील असेही नाही, रामराजे नाईक-निंबाळकर यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:39 IST

'ते राज्यपाल करतील; पण मी होणार नाही'

फलटण : ‘पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीसाठी आपण आढावा बैठक बोलावली होती, परंतु कार्यकर्त्यांचा सूर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे झुकला. तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढे काय?, निर्णय घ्या?, आपण कुठल्या पक्षात जायचे?, या प्रश्नांना उत्तर देताना मी सांगेन आपलं मुळंच अपक्षाचं आहे, तरीही मी कुठल्या पक्षात जाणार नाही, असेही नाही. आपल्या सर्वांसाठी पक्ष गौण आहे,’ असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फटलण येथे रविवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रामराजे म्हणाले, ‘कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडून शब्द पाहिजे. माझं वय झालं, तरी माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही विचारता मेळाव्यात एवढे लोक गोळा होतात, तर पराभव का होतो. याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने प्रशासन, पोलिसांवर दबाव टाकून राजकारण सुरू आहे, कंत्राटदारांची बिले अडवली जात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते घाबरून तिकडे जात आहेत.दिवंगत चिमणराव कदम सत्तेत होते त्यानंतर राजे गट सत्तेत होता. पण, आपण सत्तेचा कधी त्रास दिला नाही. सत्ता सत्तेच्या ठिकाणी, निवडणुका निवडणुकीच्या ठिकाणी, पण सध्या सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाकडून त्रास दिला जात आहे. आता आगामी निवडणुका तुमच्या अस्तित्वाच्या आहेत.’ते राज्यपाल करतील, पण मी होणार नाहीसध्या विकासाच्या दृष्टीने कोण भेटत नाही. मला स्वतःला काहीच मिळवायचं नाही. त्यांना वाटलं, तर मला राज्यपाल करतील पण मी होणार नाही. कारण, कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत, सध्या तरी माजी आमदार आणि मी एवढेच राहिलो आहोत.आता निर्णय घ्याचगावामध्ये दुष्काळ पडला, म्हणून गाव सोडून चालत नाही आणि नेत्याचा पराभव झाला, म्हणून राजकारण सोडून चालत नाही. आपली कालही निष्ठा आजही निष्ठा आणि उद्याही निष्ठा असणारच आहे. जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाशी सगळे सहमत असतील, पण महाराज आता निर्णय घ्याच, अशी आर्त हाक विजय भोंडवे, अमोल रासकर दीपक पिसाळ, शंभूराज पाटील, माधव जमदाडे, अजित बोबडे, हरिष काकडे, सतीश गावडे यांनी मांडली.मी फार्म भरतो...पदवीधर मतदारसंघाच्या नावनोंदणीसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत रघुनाथराजे यांनी ‘मीच आता फॉर्म भरतो’, म्हणत राजेगटाच्या राजकारणाची दिशा ठरली असल्याचे सूचकपणे सांगत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ramraje Naik-Nimbalkar hints at party change, prioritizing workers' existence.

Web Summary : Ramraje Naik-Nimbalkar suggested a possible party change, stating workers are paramount. He criticized the misuse of power and administration, emphasizing upcoming elections are about survival. He values worker's existence over personal gain, like a governorship.