शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

माढा लोकसभा मतदारसंघावर सातारकरांचाच दावा; रामराजे, रणजितसिंह अन् जानकरही तयारीत 

By दीपक शिंदे | Published: March 07, 2024 4:25 PM

आघाडी शांततेच्या भूमिकेत, संजीवराजे यांच्यासाठी रामराजे आग्रही

दीपक शिंदेसातारा : माढा शरद पवार यांच्या प्रतिनिधीत्वामुळे प्रतिष्ठेचा झालेला मतदारसंघ. सध्या भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर प्रतिनिधीत्व करत आहेत. हा मतदारसंघ भाजपकडे असलातरी महायुतीतून राष्ट्रवादीला मिळण्यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर प्रयत्नशील आहेत. तर खासदार रणजितसिंह पुन्हा तयारीत आहेत. त्याचबरोबर महायुतीतील ‘रासप’चे महादेव जानकर यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघात सातारकरांचा अधिक दावा असून, आघाडीत शांतता दिसत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण हे दोन तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर २००९ मध्ये पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजय मिळवला त्यांनी सुमारे ३ लाखांचे मताधिक्य घेतले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार विजयी झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे खासदार झाले. पण त्यांना केवळ काठावरचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी महायुतीतील सदाभाऊ खोत यांनी निकराची झुंज दिली होती. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा सुमारे ८५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. सध्याची स्थिती पाहता महायुतीत भाजपकडे हा मतदारसंघ आहे. असे असलेतरी महायुतीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या अजित पवार गटाकडून माढा मतदारसंघाची जागा मिळावी, अशी मागणी होत आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्यासाठी ही जागा मागितली आहे; पण भाजप ही जागा सहजासहजी सोडेल, अशी स्थिती नाही. रणजितसिंह नाईक- निंबाळकरांनी या मतदारसंघात आत्तापर्यंत सर्वाधिक कामे केल्याचा दावा केला आहे. तर विरोधकांकडून खासदारांबाबत नाराजी असल्याचा आरोप केला जात आहे. तरीही या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असणार, हे निश्चित आहे. पण, बदलत्या राजकीय घडामोडीत बरंच काही होऊ शकते. महायुतीत ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर आहेत. त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. माढा आणि परभणी मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली आहे.  जानकर यांची घोषणा अंमलात आली तर माढ्यात भाजपला कडवी झुंज मिळू शकते. त्यातच जानकर यांच्यावर महाविकास आघाडीकडून जाळे टाकण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे माढा मतदारसंघाचा तिढा युतीसाठी तरी वाढला आहे. पण, सातारा जिल्ह्यातीलच अनेक जण माढासाठी तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संजीवराजे यांच्यासाठी रामराजे आग्रही

  • रामराजेंनी आपले बंधू संजीवराजे यांच्यासाठी माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. भाजप आपला मतदारसंघ सोडण्याच्या मानसिकतेत नाही. 
  • ‘रासप’ला महाविकास आघाडी आपल्या सोबत घेण्याच्या तयारीत आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी लोकसभेची चांगली संधी आहे. 

असा झाला बदल२०१९ गत निवडणुकीतील फॅक्टर 

  • शरद पवार यांच्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मतदारसंघाची धुरा सांभाळली.  
  • राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यामुळे याठिकाणी संजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली. 
  • भाजपकडून त्यांना देण्याऐवजी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. 
  • माळशिरस तालुक्यातून रणजितसिंहांना चांगले मतदान झाल्याने विजय सोपा झाला.
  • ८५ हजारांचे मताधिक्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मिळाले.

मतदारसंघ     पुरुष        स्त्री        एकूणकरमाळा       १६५२२६    १४९४८३    ३१४७१८माढा             १७५४१५    १५७५५४   ३३२९७१सांगोला         १६१३६३    १४६२९४    ३०७६६५माळशिरस    १७३३६८   १६०२१८     ३३३६१८फलटण        १७०६४१    १६२३६३    ३३३०१८माण             १७७८१९    १६७४५०   ३४५२७९एकूण           १०२३८३२   ९४३३६२   १९६७२६९

आमदार किती कुणाचे काँग्रेस  - ००राष्ट्रवादी अजित पवार गट - ०३राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - ००शिवसेना शिंदे गट  - ०१भाजप  - ०२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरMahadev Jankarमहादेव जानकर