शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

औषधं मोफत अन् पाणी विकत --: सातारा जिल्हा रुग्णालयातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:02 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप

ठळक मुद्देनातेवाइकांना आर्थिक भुर्दंड; व्यवस्थापनाचा अभाव

दत्ता यादव ।सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांची रुग्णवाहिनी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांची राहण्याची जबाबदारी सिव्हिल प्रशासन घेतेय तर जेवणाचा खर्च सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. या दोन्ही सुविधा रुग्णांना चांगल्या प्रकारे मिळत आहेत. मात्र, पाण्याची व्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. असं पण नाही की, सिव्हिलमध्ये रोज पाणी येत नाही. पाणी उपलब्ध आहे; पण त्याचे व्यवस्थापन नीट होत नसल्याने रुग्ण आणि नातेवाइकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे.

सिव्हिलमध्ये औषधांपासून सर्वच उपचार रुग्णांना मोफत मिळत असताना पाण्यासाठी मात्र पैसे खर्च करावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही रुग्ण सिव्हिलमध्ये आठ ते दहा दिवस अ‍ॅडमिट असतात. रुग्णासोबत नातेवाईकही असतात. हे माहिती असल्यामुळे अनेक व्यावसायिकांनीही पाण्याच्या बॉटल विक्रीस ठेवल्या आहेत. प्रवेशद्वारासमोर अनेकांनी आपले दुकाने थाटली असून, पिण्याची अकरा रुपयांची बाटली वीस रुपयांना विकली जात आहे. नातेवाइकाला आणि रुग्णाला दिवसाकाठी पिण्याच्या चार बाटल्या लागल्या तरी दहा दिवसांत आठशे रुपये संबंधितांना मोजावे लागत आहेत. सिव्हिलमधून डिस्चार्ज घेताना फार फार तर दीडशे ते दोनशे रुपये रुग्णांना अत्यंत अल्प फी भरावी लागते. मात्र, औषधोपचारांपेक्षा पाण्यासाठीच पैसे खर्च होत रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.पाण्याभोवती अस्वच्छता..सिव्हिलमध्ये असणाºया पाण्याच्या टाकीभोवती प्रचंड प्रमाणात अस्वच्छता आहे. तसेच दुर्गंधीही पसरत असल्यामुळे तेथील कोणी पाणी पित नाही. परिणामी नाईलाजास्तव रुग्ण व नातेवाईक पाणी बाहेरहून विकत आणणे पसंत करत आहेत. अस्वच्छ पाणी पिले तर आणखी कोणताही आजार उद्भवेल, अशी भीती नातेवाइकांना असल्यामुळे सिव्हिलमधील पाणी पिण्यास कोणीही धजावत नाही. 

ऐन उन्हाळ्यात गरम पाणी!सध्याच्या तापमानामुळे पाण्याच्या टाकीतील पाणी गरम होत आहे. अगोदरच उन्हामुळे घसा कोरडा होत असताना थंड पाणी पिण्यासाठी अनेकांचा जीव कासावीस होत असतो. त्यामुळे हे गरम पाणी पिण्यापेक्षा बाटलीतील थंड पाणी अनेकजण पित आहेत. रुग्णांच्या सोयीसुविधेसाठी शासनाकडून लाखो रुपये निधी येत असतो. त्यातून रुग्णांना चांगले पाणी मिळावे, यासाठी वॉटर प्युरीफायर आणि कूलरसारखी सुविधा रुग्णालय प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाइकांमधून व्यक्त होत आहे.सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मिनरल बॉटलचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलwater shortageपाणीटंचाई