पुणे : अवजड ट्रेलर दोन वाहनांवर आदळून अपघात, परिसरात वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 08:29 IST2018-04-10T08:29:50+5:302018-04-10T08:29:50+5:30

चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावाच्या हद्दीत रेकॉल्ड कंपनीसमोर लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर दोन वाहनांवर आदळून अपघात झाला.

Pune: trailer collapses on two vehicles,Heavy traffic in the area | पुणे : अवजड ट्रेलर दोन वाहनांवर आदळून अपघात, परिसरात वाहतूक कोंडी

पुणे : अवजड ट्रेलर दोन वाहनांवर आदळून अपघात, परिसरात वाहतूक कोंडी

चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावाच्या हद्दीत रेकॉल्ड कंपनीसमोर लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर दोन वाहनांवर आदळून अपघात झाला. मंगळवारी (10 एप्रिल) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर ट्रेलरचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेलर ( एम एच ४६ एच २४०५ ) वरील लोखंडी कॉईलचा पॅकिंग बेल्ट तुटल्यानंतर ट्रेलर रस्त्याच्या शेजारी उभ्या केलेल्या कंटेनर व टेम्पो या दोन वाहनांवर धडकला. अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानं ग्रामस्थांनी रस्त्याच्या दिशेनं धाव घेतली व चालक-क्लिनरला सुखरुप अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले. दरम्यान, अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.  


 

Web Title: Pune: trailer collapses on two vehicles,Heavy traffic in the area