शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव तालुक्यात कठोर उपाययोजना करून कोरोनाचा प्रसार रोखा : शेखर सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

कोरेगाव : ‘कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा वेग वाढत असून, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या ...

कोरेगाव : ‘कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा वेग वाढत असून, रुग्णसंख्येत

दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर

उपाययोजना केल्या पाहिजेत, नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा,’ असे

स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

कोरेगाव प्रांत कार्यालयात कोरोनाविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक

अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी ज्योती पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी

गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य

अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘नियमांचे पालन न केल्याने रुग्णसंख्या

वाढीस हातभार लागला असून, प्रशासनाने विशेषत: पोलीस यंत्रणेने दंडात्मक

कारवाईस सुरुवात करावी. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच

पाहिजे, मंगल कार्यालयांना नोटिसा बजावून चालणार नाही, विवाह सोहळ्यावेळी

पाहणी करून, परवानगीपेक्षा जास्त लोक असल्यास तत्काळ कारवाई करा, अशा

सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी विनय गौडा व अजयकुमार बन्सल यांनी प्रशासनाला अभिप्रेत असे काम

झाल्यास कोरोनाच्या प्रसाराचा वेग आपोआप कमी होईल,’ असे स्पष्ट केले.

ज्योती पाटील, गणेश किंद्रे, अमोल कदम, डॉ. युवराज करपे, डॉ. राजेंद्र

जाधव यांच्यासह कोरेगाव व रहिमतपूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी आजवर केलेल्या

उपाययोजना व कारवाईची माहिती दिली.

चौकट :

२८ तारखेला विशेष लक्ष द्या...

२८ फेब्रुवारी रोजी विवाह मुहूर्त जास्त असून, त्यादिवशी जास्त प्रमाणात

गर्दी कशी टाळता येईल, याकडे प्रशासनाने विशेषत: पोलीस दलाने लक्ष केंद्रित करावे. दंडात्मक कारवाई वाढवा, कोणत्याही परिस्थितीत नियमांचे

तंतोतंत पालन झालेच पाहिजे, अशा सूचना जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी दिल्या.