सध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 04:37 PM2019-09-11T16:37:22+5:302019-09-11T16:39:42+5:30

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली.

The present government is the capitalist: Bharat Patankar | सध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकर

सध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकर

Next
ठळक मुद्देसध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकरपूरपरिस्थिती हाताळण्यात शासन अपयशी

कऱ्हाड : सध्या सत्तेवर असलेलं सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर भांडवलदारांचं सरकार आहे. सध्या देशात मोठी मंदी निर्माण झाली आहे. याला यापूर्वीची सरकारेही जबाबदार आहेत. स्वातंत्र्यापासून विकासाच्या दिशाच चुकलेल्या आहेत. त्यापासून आतापर्यंत सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचे आहेत, असे सांगत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली.

श्रमिक मुक्ती दलाचा वार्षिक महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बुधवारी डॉ. भारत पाटणकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, सिद्धेश्वर पाटील, चंद्र्रकांत पाटील, शिवाजी शिंदे, जयसिंग गावडे, संभाजी पाटील यांची उपस्थिती होती.

डॉ. पाटणकर म्हणाले, ह्यया मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसह पाटण तालुक्यातील समन्यायी पाणीवाटपाचा संघर्ष, कऱ्हाड विमानतळ आणि तारळी धरणग्रस्तांची सध्या सुरू असलेली चळवळ, नवे कृषी औद्योगिक धोरण, बडवे हटवल्यानंतर चालू झालेल्या पुरुष सुक्त हटाव चळवळीचा कार्यक्रम, वारकरी संतांची संस्कृती हीच महाराष्ट्राची संस्कृती, या भूमिकेच्या आधारे केले जाणारे विचार मंथनाची प्रक्रिया, अशा विषयांबाबतचे विविध ठरावही यावेळी घेण्यात येणार आहे,ह्ण अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्यात समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावा

वीस वर्षांच्या संघर्षानंतर दुष्काळग्रस्त आटपाडी, सांगोला, तासगाव तालुक्यांतील प्रत्येक कुटुंबाला पाच एकराचे बागायत मिळेल, एवढे प्रकल्प मिळाले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील वगळलेली सर्व गावेही यात सहभागी होतील.

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी उचलून संबंधित दुष्काळी भागात पोहोचवल्यास येथील महापुराचा फटका सौम्य होईल. आटपाडी पॅटर्न राबवल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, त्यामुळे सरकारने राज्यभरात समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावा, असे मत पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले.

अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

Web Title: The present government is the capitalist: Bharat Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.