शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; साताऱ्याच्या प्रस्तावित रिंगरोडची तयारी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:11 IST

भूसंपादनासाठी लागणार २० कोटी रुपये

सातारा : ‘सातारा शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचे रेखांकन तयार असून, प्रशासकीय पातळीवर या कामाची तयारी सुरू झाली आहे. रिंगरोडसाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाची जबाबदारी पालिकेची असून, यासाठी सुमारे २० कोटी रुपये लागणार आहे. या रस्त्यामुळे कास, ठोसेघरला जाणाऱ्या पर्यटकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होईल,’ अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि. २२) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कास रस्त्याला जाण्यासाठीच्या रिंगरोडचे रेखांकन तयार आहे. शाहूनगरमार्गे अजिंक्यतारा, अदालतवाडाची पिछाडी, बोगदा येथून पॉवर हाऊस व महादरे, पेढ्याचा भैरोबा मार्गे मेढ्याच्या जुन्या रस्त्याला जोडला जाईल. यामध्ये भूसंपादनाची जबाबदारी पालिकेची असून, त्यासाठी अंदाजे २० कोटी रुपये लागणार आहेत. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाईल. सुरूर ते पोलादपूर या रखडलेल्या रस्त्याबाबत ते म्हणाले, ‘संबंधित ठेकेदाराकडून या कामात निश्चितच दिरंगाई करण्यात आली. या दिरंगाईचा नागरिक, व्यावसायिकांना फटका बसला. मंत्रालयातील बैठकीत संबंधित ठेकेदाराला काम वेळेत मार्गी न लावल्यास कारवाई करण्याच्या इशारा देण्यात आल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. दरम्यान, साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा, महाराणी ताराराणी यांची समाधी, मुनावळे ते वासोटा रोपवे, दरे येथे निसर्गोपचार केंद्र, कटगुण येथे महात्मा फुले यांचे तर नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना आधार देणारा अर्थसंकल्पराज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून राज्यात १६ हजार मेट्रिक वॅट ऊर्जाक्षमता निर्माण केली जाणार आहे. यातून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २ हजार २४० कोटींचा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याचबरोबच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळविण्यात येईल, अशी माहितीही यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Ring Road to Ease Tourist Traffic; Preparation Begins

Web Summary : Satara's proposed ring road aims to alleviate traffic congestion for tourists heading to Kaas and Thoseghar. The project includes land acquisition managed by the municipality, with construction overseen by the Public Works Department. The government also announced initiatives for farmers and flood management projects.