एफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:25 IST2019-06-11T17:22:24+5:302019-06-11T17:25:13+5:30
सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे
सातारा : सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खलाटे म्हणाले, ऊस गेल्यानंतर कारखानदारांकडून १४ दिवसांत एफआरपीची रक्कम मिळणे बंधनकारक असतानाही गळीत हंगाम संपून चार महिने उलटल्यानंतर सुद्धा एफआरपीच्या रकमेपैकी १५०० कोटी रुपये अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ही रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह येत्या आठ दिवसांत मिळावी.
शेतकऱ्यांना एफआरपी नुसार रक्कम मिळण्यासाठी शासनाने कारखान्यास कोणत्या दिवशी नोटीस पाठविली व त्या नोटीशीस कारखान्याकडून कोणते उत्तर मिळाले, ही माहिती शेतकऱ्यांना आॅनलाईन उपलब्ध व्हावी, यासाठी उपाय योजना व्हाव्यात. ऊसबिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅपची तातडीने अंमलबजावणी करावी.
या सर्व मागण्या आठ दिवसांत पूर्ण कराव्यात, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाही खलाटे यांनी यावेळी दिला.