शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

शक्तिप्रदर्शनाने दोन्ही राजेंचे अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह; ठिकठिकाणी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:42 IST

उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील भवानीमातेचे दर्शन घेतलं तर आपल्या आई कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वाद घेतले. तर शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची वाड्यातील अभयसिंहराजे भोसले आणि मातोश्री अरुणाराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

ठळक मुद्देसातारा शहरात रॅली : फटाक्यांची आतषबाजी

सातारा : भाजपतर्फे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी साताऱ्यामध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. उदयनराजे यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघासाठी सातारा प्रांताधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

दोन्ही राजे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याने मंगळवारी जलमंदिर व सुरुची या दोन्ही वाड्यांवर कार्यकर्त्यांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. राजेंनी सकाळी कुलदैवतांचे दर्शन घेतलं. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील भवानीमातेचे दर्शन घेतलं तर आपल्या आई कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वाद घेतले. तर शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची वाड्यातील अभयसिंहराजे भोसले आणि मातोश्री अरुणाराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच अजिंक्यतारा साखर कारखान्यावरील भवानीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी ते सकाळी गेले. अदालतवड्यामध्ये त्यांचे काका ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले आणि काकी चंद्रलेखाराजे भोसले यांचे आशीर्वाद घेण्यासाठीही दोघे गेले. निवासस्थानी परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे अलोट उत्साहात स्वागत केले.

राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी दोन्ही राजेंचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गोल बागेतील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (थोरले) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये कार्यकर्ते राजेंच्या नावाचा जयघोष करत होते. मोती चौकातून ही रॅली देवी चौकाकडे गेली. तिथून कमानी हौदमार्गे शेटे चौक व तिथून पोलीस अधीक्षक कार्यालयामार्गे ती नाक्यावर गेली. या ठिकाणी दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

तिथून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्यासोबत शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, क-हाड दक्षिणचे नेते डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, मदन भोसले, भरत पाटील, सुवर्णा पाटील, शंकर माळवदे आदींची उपस्थिती होती. प्रांताधिकारी कार्यालयात शिवेंद्रसिंहराजेंचा अर्ज भरताना वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह सर्व मंडळी उपस्थित होती.

शिवेंद्रसिंहराजेंना आणायला उदयनराजे गेलेअदालतवाड्यातून दोघेही पुन्हा आपल्या निवासस्थानी परतले. त्यानंतर गांधी मैदानापासून भव्य रॅली काढण्यात येणार होती. उदयनराजे स्वत: आपली गाडी घेऊन सुरुचीवर गेले. शिवेंद्र्रसिंहराजे यांना आपल्या गाडीत बसवून ते गांधी मैदानावर आले.फडणवीसांचा उदयनराजेंना फोन

उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मोबाईलवर फोन केला. पाटील यांनी आपला फोन उदयनराजेंकडे दिला. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना फोनवरून शुभेच्छा दिल्या.

आजी-माजी नगरसेवकांची हजेरीनिवडणुकीत कधी काळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले व ज्यांच्यातून साधा विस्तवही जात नाही, असे आजी-माजी नगरसेवक या रॅलीच्या निमित्ताने एकत्र आले. एकमेकांची विचारपूस न करणारे नगरसेवकहीगप्पा मारताना दिसून आले. कमळाचे चिन्ह असलेल्या टोप्या, मफलर तसेच झेंड्यांचे समर्थकांना वाटप करण्यात आले. भाजपप्रेमींनी रॅलीत सहभाग घेतला. 

कंदी पेढ्यांचा अभिषेकउदयनराजे भोसले यांनी लोकसभेसाठी व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेसाठी प्रथमच एकत्र अन् एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना दोन्ही राजेंकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. गांधी मैदानातून निघालेली रॅली कमानी हौदाकडे मार्गस्थ झाली. यावेळी एका समर्थकाने चक्क दोन्ही राजेंना कंदी पेढ्यांचा अभिषेक घातला. साताऱ्यातील राजकारणाच्या इतिहासात अशा प्रकारे अभिषेक घालण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक