शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

सहकार विभागाचे राजकीय षड्यंत्र

By admin | Updated: April 6, 2015 01:30 IST

जिल्हा बॅँक : माजी संचालकांचा आरोप; अपात्रतेला आव्हान देणार

सांगली : ऐन निवडणुकीत जिल्हा बॅँकेच्या ४० माजी संचालकांवर चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित करून त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरविण्याची सहकार विभागाची कृती म्हणजे राजकीय षड्यंत्रच आहे, असा गंभीर आरोप माजी संचालक विलासराव शिंदे आणि प्रा. सिकंदर जमादार यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. याप्रकरणी उच्च न्यायालयात आज, सोमवारी दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी वीस हजार रुपयांच्या लेखापरीक्षण शुल्क वसुलीची जबाबदारी बॅँकेच्या ४० माजी संचालकांवर शनिवारी निश्चित करण्यात आली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील ७३ (क व अ) या कलमानुसार हे ४० संचालक निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले आहेत. सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी ही कारवाई केली. हे सर्व संचालक १९९७ ते २०१२ या तीन पंचवार्षिक कालावधीतील असून, या दिग्गज नेत्यांना बँकेच्या कारभारापासून दूर राहावे लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव आहे, अशा अनेक माजी संचालकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहे. अशावेळीच सहकार विभागाने चौकशी शुल्काचा दणका दिल्याने यामागे राजकीय षड्यंत्र असल्याची टीका आता होत आहे. माजी संचालकांनी ही कारवाई जाणीवपूर्वक निवडणूक कालावधीत करून माजी संचालकांना अडचणीत आणले असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि प्रा. जमादार यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात आज, सोमवारी दाद मागणार असल्याचे सांगितले. न्यायालयाकडून याप्रकरणी योग्य न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. अद्याप नोटिसा नाहीत जिल्हा बॅँकेच्या ४० माजी संचालकांवर प्रत्येकी ४२५ रुपये चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र, अद्याप याबाबतच्या नोटिसा सहकार विभागाकडून माजी संचालकांना प्राप्त झाल्या नाहीत. सोमवारी किंवा मंगळवारी या नोटिसा प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर माजी संचालक न्यायालयात जाणार आहेत. यांनी दाखल केले अर्ज चौकशी शुल्काची जबाबदारी ज्यांच्यावर निश्चित केली आहे, अशा माजी संचालकांपैकी विजय सगरे, डी. के. पाटील, इद्रिस नायकवडी, दिलीप वग्याणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले जात असतानाच कारवाई का केली? आक्षेपार्ह रकमेबद्दलची चौकशी सुरू असतानाच चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित करून राजकीयदृष्ट्या अडचण निर्माण केली जात आहे. आम्ही याप्रकरणी न्यायालयाकडे दाद मागू. - विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी हे एक राजकीय षड्यंत्र आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील आक्षेपार्ह रकमेची जबाबदारी निश्चित झाल्यानंतरही माजी संचालकांना न्यायालयीन दिलासा मिळाला होता. त्यामुळे न्यायालयाकडून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. - प्रा. सिकंदर जमादार, माजी संचालक