शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-पोलीस पाटलांचे मानधन सात महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:36 IST

ग्रामस्थ, पोलीस व महसूल, आरोग्य प्रशासन यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून पोलीस पाटील हे पद आहे. मात्र, या पोलीस पाटलांचे गेल्या सात महिन्यांपासून मानधन रखडले आहे तर कोरोना विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग असलेल्या पोलीस पाटलांचे नावही शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर भत्ता यादीत नसल्याने पोलीस पाटलांकडून मोठी खंत व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रोत्साहनपर भत्ता यादीत नावही गायब परराज्यातील आलेल्या व्यक्तींची माहिती देतायत आरोग्य, प्रशासन विभागाला

मायणी : ग्रामस्थ, पोलीस व महसूल, आरोग्य प्रशासन यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून पोलीस पाटील हे पद आहे. मात्र, या पोलीस पाटलांचे गेल्या सात महिन्यांपासून मानधन रखडले आहे तर कोरोना विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग असलेल्या पोलीस पाटलांचे नावही शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर भत्ता यादीत नसल्याने पोलीस पाटलांकडून मोठी खंत व्यक्त होत आहे.शासनाने गत तीन वर्षांपूर्वी जातीनिहाय आरक्षण सोडत काढून परीक्षा पद्धतीने प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील हे पद भरले. परीक्षा पद्धत असल्याने अनेक सुशिक्षित युवकांनी यामध्ये सहभाग घेतला व आपल्या बुद्धीच्या जोरावर ही परीक्षा यशस्वी केली. त्यामुळे जिल्ह्यात आज अनेक तरुण व मध्यम वयातील पुरुष व महिला पोलीस पाटील झाले आहेत.त्याकाळात शासनाकडून पोलीस पाटलांसाठी प्रति महिना तीन हजार रुपये मानधन दिले जात होते. वाढती महागाई व पोलीस पाटलांचे काम लक्षात घेऊन शासनाने गतवर्षी हे मानधन तीन हजारांवरून सहा हजार रुपये केले. त्यामुळे पोलीस पाटलांनामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. मात्र, गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून आजअखेर सलग सात महिने पोलीस पाटलांचे मानधन रखडले आहे.अनेकवेळा शासनाकडे रखडलेल्या मानधनाविषयी पोलीस पाटलांकडून चौकशी केली जात आहे. मात्र, आजअखेर त्यांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रखडलेले मानधन देऊन या तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांचे मानधन नियमित प्रतिमहिना कसे देता येईल, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना आखल्या आहेत. या उपाययोजना ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पोलीस पाटलांकडून केले जात आहे. तसेच परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभाग व प्रशासनाला पोलीस पाटील देत आहेत. तसेच गावातील अडीअडचणी शासनापुढे मांडून त्यावर उपाययोजना करण्यात पोलीस पाटलांची महत्त्वपूर्ण भूमिका असतानाही शासनाने या काळात जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्ता यादीमध्ये पोलीस पाटलांचे नाव नाही, ही खरी शोकांतिका आहे.

सलग सात महिने मानधन रखडले असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच अनेक जणांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.-प्रशांत कोळी, जिल्हा संघटक, पोलीस पाटील संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस