शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आराखडा नामंजुरीची नामुष्की !

By admin | Updated: November 22, 2015 00:03 IST

अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश : कामांच्या याद्या नसल्याने आमदारांचा विरोध; ४ डिसेंबरला फेरबैठक

सातारा : जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत कामांच्या याद्या देण्यात प्रशासनाने कसूर केल्याने हा आराखडा नामंजूर करण्याची नामुष्कीच ओढवली. आमदार जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा उपस्थित करून ‘बेकायदा ठराव करणार काय?’, असा संतप्त सवाल पालकमंत्री विजय शिवतारे यांना विचारला. दरम्यान, कामांच्या याद्या देण्यात कसूर करणाऱ्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना चौकशीनंतर बडतर्फ करण्याचे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. जिल्ह्याचा २०१६-१७ सालाचा २१८ कोटींचा नियोजन आराखडा मंजूर करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. पालकमंत्री विजय शिवतारे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना आमदार जयकुमार गोरे यांनी नियोजन आराखड्यासोबत कामांच्या याद्या जोडल्या नसल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आराखडा अपूर्ण असून, तो बेकायदेशीर ठरला आहे. त्यामुळे कायद्याने नियोजन आराखड्याला मंजुरी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही गोरेंचा हा मुद्दा उचलून धरून नवीन बैठक लावण्याची सूचना मांडली. यावर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी यांना धारेवर धरले. ‘कामांच्या पूर्ण याद्या आल्या नसल्याने त्या आराखड्यासोबत जोडल्या नसल्याचे माळी यांनी केलेले स्पष्टीकरण सदस्यांना दिशाभूल करणारे आहे,’ असा आरोप आमदार गोरे यांनी केला. आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच सदस्यांनी गोरेंच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘त्यातूनही वेळ घालवायला नको,’ असे म्हणत पालकमंत्र्यांनी आराखड्याला मंजुरी देण्याची विनंती केली. पण आमदारांसह इतर सदस्यांचा विरोध कायम राहिला. जवळपास एक तास यावर खल सुरू होता. पालकमंत्र्यांनी याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांना जवळ बोलावून त्यांच्या कानात काही चर्चा केली. खासदार उदयनराजेंनी सर्व सदस्यांच्या वतीने याबाबत आपले मत व्यक्त करताना आराखडा नामंजूर करताना कोणी राजकारण आणत नाही. पालकमंत्र्यांचा अवमान करण्याचाही त्यात हेतू नाही; पण आराखड्याला मंजुरी दिली गेल्यास ते बेकायदा ठरेल, त्यामुळे ज्या यंत्रणेने याद्या दिल्या नाहीत, त्यांच्याकडून बैठकीचा खर्च वसूल करण्याची मागणी केली. यानंतर पालकमंत्र्यांनी आराखडा मंजुरीसाठी दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बैठक घेण्याचा निर्णय जाहीर केला.