'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:12 IST2025-10-30T12:10:38+5:302025-10-30T12:12:07+5:30
ज्या हॉटेलमध्ये संबंधित महिलेने आत्महत्या केली त्या हॉटेलमध्ये रात्री किती वाजता ती आली, हॉटेलमधील रूम मिळविण्यासाठी तिने संबंधित कर्मचाऱ्यांना नेमकं काय सांगितले? किती नंबरच्या रूममध्ये ती राहिली.

'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
फलटण : फलटण येथे एका उच्चशिक्षित महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असताना, तिच्या मृत्यूच्या वेळेस घडलेल्या घटनाक्रमातील प्रत्येक तपशील आता गूढ आणि थरार निर्माण करत आहे.
ज्या हॉटेलमध्ये संबंधित महिलेने आत्महत्या केली त्या हॉटेलमध्ये रात्री किती वाजता ती आली, हॉटेलमधील रूम मिळविण्यासाठी तिने संबंधित कर्मचाऱ्यांना नेमकं काय सांगितले? किती नंबरच्या रूममध्ये ती राहिली.
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
एकूण १७ तासांमध्ये त्या हॉटेलमध्ये काय घडामोडी घडल्या, घटना कशी उघडकीस आली? या सर्व घटना काळजाचा ठोका चुकविणाऱ्या आहेत. संबंधित हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी माध्यमांपुढे 'त्या' रात्रीचा घटनाक्रम बुधवारी कथन केला. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडाही केला. पीडित महिलेचे संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..
२३ तारखेची मध्यरात्र. १ वाजून २३ मिनिटांनी एक दुचाकी हॉटेलच्या गेटवर धडकली. दुचाकीवर एकटी महिला डॉक्टर होती. 'भी बारामतीला चालली आहे, पण रस्ता लांब आहे. मी एकटीच आहे, मला फक्त एक रात्र राहू द्या' तिच्या या विनंतीनंतर सुरक्षा सुरक्षारक्षकाने हॉटेलचे गेट उघडले. केवळ तीन मिनिटांत ती स्वागत कक्षात पोहोचली. तिने स्वतःच रजिस्टरमध्ये नाव नोंदवले, आधारकार्ड दिले आणि 'पेमेंट सकाळी करते' असे सांगून, रात्री १ वाजून ३० मिनिटांनी तिने रूम नंबर ११४ मध्ये प्रवेश केला सतरा तासांची 'ती' गूढ शांतता..
१ रूममध्ये प्रवेश केल्यावर जणू त्या खोलीचे दरवाजे बाहेरील जगासाठी कायमचे बंद झाले. हॉटेलमध्ये इतरत्र नेहमीची वर्दळ होती, पण रूम नंबर ११४ मध्ये शांतता पसरली होती. सकाळ झाली, ११ वाजले. मॅनेजरने एक औपचारिकता म्हणून दार वाजवले; परंतु आतून कसलाही प्रतिसाद आला नाही.
मॅनेजरला वाटले 'महिला रात्री उशिरा आली आहे, 3 कदाचित शांत झोपली असेल.' पण दुपार झाली तरीही तिने एक कप चहा किंवा पाण्याचीही मागणी केली नाही. ना कोणती हालचाल ना कोणता आवाज. या शांततेमुळे हॉटेल मॅनेजरचा धीर सुटला. सायंकाळी चार वाजता पुन्हा दार वाजवले, पण आतून एकही शब्द नाही. त्यामुळे ही गोष्ट आता केवळ शांतता नव्हती, ते एक रहस्य बनू लागले होते.
यानंतर हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांना पाचारण करण्यात आले. काही वैद्यकीय आणीबाणी असू शकते, असा कयास बांधत हॉटेलकडे असणाऱ्या दुसऱ्या चावीने दार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला अन् तब्बल १७ तासांनंतर '११४' मधील ते रहस्य उघड झाले.
अन् तपास सुरू
सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावी लावली आणि दार उघडले. हे करत असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू ठेवण्यात आले. आतमध्ये दिसलेले ते दृश्य भय, वेदना आणि आत्महत्येचं गूढ एकाच क्षणी समोर आले. ती महिला डॉक्टर रूमच्च्या पंख्याला लटकलेली होती. हे पाहतानाच सतरा तासांची ती शांतता कायमची भंग पावली होती. काही क्षणातच हॉटेल स्टाफने दार बंद करून पोलिसांना बोलावले. सायंकाळी सातच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू झाला.
पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
पीडिता डॉक्टर दि. २३ रोजी रात्री १:२३ मिनिटांनी हॉटेलच्या गेटवर आली.
रात्री १:२६ मिनिटांनी स्वागत कक्षात आली व स्वतःची नोंदणी केली.
रात्री १:३० वाजता ती रूम नंबर ११४ मध्ये गेली.
सकाळी ११ वाजता हॉटेल स्टाफने दार वाजवले, पण प्रतिसाद मिळाला नाही.
सायंकाळी ६:४५ वाजता दुसऱ्याचा चावीने त्या रूमचे दार उघडले.
महिलेने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच ६:४५ वाजता लगेच दार बंद करण्यात आले.
अंदाजे सात वाजता पोलिस घटनास्थळी आले अन् पुढील कारवार्ड सरू झाली.