शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयाचे रुपडे पालटले

By admin | Updated: August 20, 2015 20:53 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : मंगळवार पेठेतील नागरिकांमध्ये समाधान--लोकमतचा प्रभाव

सातारा : येथील मंगळवार पेठेतील संत कबीर सोसायटीमधील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने या सार्वजनिक शौचालयाचे रुपडेच पालटून टाकले.येथील मुख्य रस्त्यावरच सांडपाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पेठेपासून काही अंतरावर वास्तव्यास असणारे नगराध्यक्ष सचिन सारस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या पेठेतील नागरिकांमधून होत होती. चिपळूणकर बागेजवळ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. चार पुरुषांसाठी तर चार महिलांसाठी सार्वजनिक शौचालये आहेत. महिलांची शौचालये बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. परंतु पुरुषांची शौचालये अत्यंत खराब झाली होती. शौचालयाचे दरवाजे तुटलेले आणि आतून कड्या नाहीत, अशी अवस्था होती.तसेच आतील भांडीही फुटलेली होती. येथील नागरिकांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौचालयाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती; परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. मात्र, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. नगराध्यक्ष सचिन सारस आणि माजी नगरसेवक अशोक शेडगे यांनी शौचालयाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले. सार्वजनिक शौचालयाला नवीन दरवाजे बसविण्यात आले आहेत. तसेच आतील फरश्या आणि भिंतीला रंगकाम करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावर सांडपाणी येत होते. ते बंधिस्त करण्यात आले आहे. शौचालयाचे रुपडे पालटल्याने नागरिकांत समाधान आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’ला धन्यवादमंगळवार पेठेतील सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिक अक्षरश: हतबल झाले होते. ‘लोकमत’ने नागरिकांची समस्या जाणून घेऊन वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे नागरिकांची कायमस्वरूपी समस्या मिटली. त्यामुळे अनेक नगरिकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.