शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पाटण पंचायत समितीत ‘सही रे सही’ राजकारण

By admin | Updated: August 22, 2014 00:56 IST

पाटण तालुका : पाटणकर गटाकडून सभापतींना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न

अरूण पवार - पाटण -आगामी विधानसभा निवडणुकीचे पडसाद पाटण पंचायत समितीतदेखील उमटू लागले आहेत. पाटणकर आणि देसाई गटांत केवळ ‘सही’च्या मुद्द्यावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. स्वातंत्र्यदिनीच सभापती वनिता कारंडे यांना खिंडीत गाठून पाटणकर गटाच्या सदस्यांनी सहीसाठी घेराव घातला तर एकट्या सभापती असल्याचे ओळखून पाटणकर गटाच्या सदस्यांनी केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप देसाई गटाकडून केला आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वीच्या कालावधीत दोन्ही गटांमध्ये जोरदार चकमकी होणार, अशी चिन्हे आहेत. १४ सप्टेंबरला पाटण पंचायत समितीचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपणार आहे. त्यातच आमदारकीच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अडीच वर्षांची पहिली टर्म शंभूराज देसाई गटाच्या ताब्यात जाऊन वनिता कारंडे या सभापती झाल्या तर पाटणकर गटाचे राजाभाऊ शेलार उपसभापती आहेत. मात्र, सत्ता असूनही ती राबविता आली नाही आणि सभापतींना इतरांची साथ नाही. यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत पाटणकर गटाने सभापतींना टार्गेट करून बाजी मारली. यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उद्घाटनावरून सभापतींचे पती बांधकाम अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादात अडकले तर सभापती दीर्घकाळ रजेवर राहिल्याने लोकांची कामे रखडली, असे आरोप पाटणकर गटाकडून झाले. १५ आॅगस्टला पाटण पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमाला सत्ताधारी देसाई गटाच्या सभापती उपस्थित होत्या. तर पाटणकर गटाचे सहा सदस्य उपस्थित होते. ११ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेत पाच कोटी दहा लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येऊन तो कोणत्या गावांना वाटप करण्यात आला ती यादी वाचून दाखविली. त्यावर एकाही सदस्याने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे ठराव मंजूर झाल्याचे समजण्यात आले. त्या ठरावावरून गटविकास अधिकाऱ्यांनी सही केली. मात्र सभापतींची सही होणे गरजेचे होते.‘सही’चे घोडे इथेच अडकले !मंजूर झालेला पाच कोटी दहा लाखांचा निधी आमच्यामुळे मिळाला असल्याचा दावा विरोधी गटाच्या सदस्यांनी केल्यामुळे साहजिकच सभापती वनिता कारंडे यांनी त्या ठरावावर सही करण्याअगोदरच सावध पवित्रा घेतला . त्यामुळे ‘स्वातंत्र्यदिनीच सक्तीने सही करा,’ असा आग्रह धरण्याची रणनीती गडबडली. त्यामुळे पाटण पंचायत समितीत सहीचे राजकारण भरपूर झाले असले तरीही; नेमके घोडे इथेच अडले.