पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 09:23 PM2022-07-11T21:23:33+5:302022-07-11T21:25:02+5:30

जखमींवर शिरवळ तसेच पुणे येथे उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये खासगी बसचालकाला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Passengers waiting for vehicles on the highway of pune-bengluru were blown up by a private bus accident | पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले

Next

मुराद पटेल

सातारा/शिरवळ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथील पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना भरधाव आलेल्या खासगी प्रवासी वाहनाने उडविले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी झाला. जखमींवर शिरवळ तसेच पुणे येथे उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये खासगी बसचालकाला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळ व शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एका खासगी कंपनीमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या मयूर रवींद्र रावे (वय २३, सध्या हिंजवडी, पुणे. मूळ रा. चिखली, जि. बुलडाणा) हा तरुण कंपनीमधील मुलाखत संपवून पुणे येथे जाण्याकरिता खासगी कंपनीमधील अधिकारी रणजित राजाराम कुंभार (३२, रा. सातारा) यांच्यासमवेत शिरवळ हद्दीमधील महामार्गावर पुणा थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत होता. दरम्यान, कर्नाटकहून पुणे बाजूकडे निघालेल्या भरधाव खासगी प्रवासी वाहन (एआर ०२ ए ९६९१) चा चालक गुरुराज तमन्ना कुलकर्णी (२६, रा. फत्तेपूर, तालीकोट, जि. विजयपूर, कर्नाटक) याने अचानकपणे महामार्गावर रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना गतिरोधक समजून अचानक ब्रेक मारले. त्यानंतर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर फिरत वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्यांवर गेले.

यामध्ये मयूर रावे, रणजित कुंभार (रा. पुणे), निकिता दत्तात्रय जाधव (२३, रा. अतिट, ता. खंडाळा) व दुकानाचे साहित्य खरेदी करण्याकरिता पुणे याठिकाणी निघालेल्या सुंदर सुरेश मोदी (२८, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत चारही प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी गंभीर जखमी मयूर रावे व निकिता जाधव यांना पुणे येथे अधिक उपचाराकरिता पाठविले. बसचालक गुरुराज कुलकर्णी याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयूर रावे याने शिरवळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बसचालक गुरुराज कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार अरुण भिसे-पाटणकर तपास करीत आहे.

पुणा थांबा बंद करण्याकरिता तीन दिवसांपूर्वीच पत्र

शिरवळ येथील पुणा थांबा अपघाताचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. वारकऱ्यांच्या वाहनांना अपघात होऊन वारकरी जखमी झाले होते. एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी याबाबत तत्काळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार करीत सदरील पुणा थांबा लोखंडी दुभाजकाने बंद करीत पुणा थांबा महामार्गाच्या पुढे हलविण्याबाबत सूचना करीत पत्रव्यवहार केला आहे.
 

Web Title: Passengers waiting for vehicles on the highway of pune-bengluru were blown up by a private bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.