तेरा विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलीस ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 15:19 IST2020-02-14T15:17:17+5:302020-02-14T15:19:05+5:30

भिलार, ता. महाबळेश्वर येथील केंब्रिज शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, संबंधित मुलांच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे.

The parents of thirteen students rushed to the police station | तेरा विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलीस ठाण्यात धाव

तेरा विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलीस ठाण्यात धाव

ठळक मुद्देतेरा विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलीस ठाण्यात धावपालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार देण्याच्या पवित्रात

सातारा : भिलार, ता. महाबळेश्वर येथील केंब्रिज शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, संबंधित मुलांच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,भिलारमधील केंब्रिज शाळेतील १३ मुले अचानक बेपत्ता झाली होती. ती मुले पाचगणी पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी मुलांकडे प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी शाळा प्रशासन मारहाण करते, जेवण देत नाही यासह अन्य तक्रारी करून पुन्हा शाळेत जाणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पाचगणी पोलिसांनी त्या मुलांना साताऱ्यातील निरीक्षण गृहात सोडले. बाल कल्याण समितीने संबंधित मुलांचा जाबजबा घेऊन या प्रकाराची माहिती घेतली. आता या मुलांच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार देण्याच्या पवित्रा घेतला आहे. गुरुवारी रात्री बरेच पालक शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: The parents of thirteen students rushed to the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.