Pahalgam Terror Attack: सातारकरांकडून जम्मूची विमान तिकिटे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:40 IST2025-04-23T14:39:34+5:302025-04-23T14:40:08+5:30

सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला. याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अनेकांनी काश्मीरला फिरण्यासाठी ...

Pahalgam Terror Attack Flight tickets to Jammu cancelled by Satarkars | Pahalgam Terror Attack: सातारकरांकडून जम्मूची विमान तिकिटे रद्द

Pahalgam Terror Attack: सातारकरांकडून जम्मूची विमान तिकिटे रद्द

सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला. याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अनेकांनी काश्मीरला फिरण्यासाठी जाण्याचा बेत रद्द केला. यामध्ये काही सातारकरांचाही समावेश आहे. त्यांनी ऐनवेळी विमान तिकिटे रद्द केली आहेत.

साताऱ्यातील दाम्पत्य पुणे येथे वास्तव्यास आहे. आयटी इंजिनिअर आणि प्राध्यापिका असलेल्या दाम्पत्याने पुढील आठवड्यात जम्मू-काश्मीर येथे फिरण्यासाठी विमानाची चार तिकिटे तसेच तेथील हाॅटेल बुक केले होते. काश्मीरला पहिल्यांदाच फिरण्यासाठी जात असल्याने हे दाम्यत्य अगदी आनंदीत होते. 

परंतु, मंगळवारी सायंकाळी काश्मीर येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे समजताच त्यांनी विमानाची तिकिटे व हाॅटेलचे बुकिंग रद्द केले. तसेच साताऱ्यातील आणखी तिघांनीही याच कारणाने विमानाची तिकिटे रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. जिवापेक्षा पैसे महत्त्वाचे नाहीत. आमचे पैसे गेले तरी चालतील. पण धोका नको म्हणून या सातारकर पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला जाणे रद्द केले.

Web Title: Pahalgam Terror Attack Flight tickets to Jammu cancelled by Satarkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.