शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पडळ कारखाना कामगार खून प्रकरण- माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह वीस जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:41 IST

Crime News Police Satara- पडळ (ता. खटाव ) येथील खटाव - माण अँग्रो प्रोसेस लि. पडळ येथे कार्यरत असणारे अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांना मारहाण करुन त्यांचा खून केल्या प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, त्यांचे बंधू संग्राम घोरपडे आदी २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देपडळ कारखाना कामगार खून प्रकरण- माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह वीस जणांवर गुन्हा दाखल जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडेंसह सहा जणांना अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी

वडूज : पडळ (ता. खटाव ) येथील खटाव - माण अँग्रो प्रोसेस लि. पडळ येथे कार्यरत असणारे अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांना मारहाण करुन त्यांचा खून केल्या प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, त्यांचे बंधू संग्राम घोरपडे आदी २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोज भीमराव घोरपडे (वय ४४), संग्राम भीमराव घोरपडे ( ४०), सनी दयानंद क्षीरसागर (२६), रणजीत धनाजी सूर्यवंशी (२२ ), शुभम राजेंद्र घाडगे ( २२ )रोहित रामदास कोलुगडे ( २५ ) यांना वडूज पोलीसांनी ताब्यात घेतले. सदर गुन्हयातील संशयीत सहा जणांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना मंगळवार दि. १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.‌याबाबत अधिक माहिती अशी की , पडळ येथील खटाव- माण अँग्रो प्रोसेस लि. पडळ कारखान्यात कार्यरत असणारे प्रोसेसिंग मुख्य अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय ४० रा गोवारे, ता. कऱ्हाड) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू मारहणीत झाल्याची चर्चा होती. जगदीप थोरात यांनी कारखान्यावर नोकरी करत असताना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून कारखान्याचे संचालक मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे, शेडगे मामा व अनोळखी १० ते १२ यांनी फायबर काठी, ऊस, सळी तसेच लाथाबुक्यांनी बुधवारी दि .१० रोजी सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान मारहाण केली.

यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला. तसे जाबजबाबही पोलिसांनी घेतले. दरम्यान, थोरात यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याने कऱ्हाड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादी वरून जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पी.ए.अंजनकुमार,अशोक नलवडे,शेंडगे मामा आणि अनोळखी दहा ते बारा जणांच्यावर ३०२, १४३, १४७, १४८, १४९ व ३२३ कलमान्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सपोनी मालोजीराजे देशमुख व पोलीस उपनिरिक्षक शितल पालेकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर