शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

जखीणवाडीत सरपंचपद खुले असूनही महिलांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

दरम्यान, नांदलापुरात सरपंचपद अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी आरक्षित आहे. निवडून आलेल्यांमध्ये या प्रवर्गातील कोणीही उमेदवार नसल्यामुळे पद रिक्तच राहिले; तर ...

दरम्यान, नांदलापुरात सरपंचपद अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी आरक्षित आहे. निवडून आलेल्यांमध्ये या प्रवर्गातील कोणीही उमेदवार नसल्यामुळे पद रिक्तच राहिले; तर आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाचे मानसिंग लावंड यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या जखीणवाडीच्या निवडणुकीत बिनविरोधाला फाटा देत सर्व ११ जागांवर निवडणूक झाली. उंडाळकर, चव्हाण गट विरुद्ध भोसले गटातच मुख्य लढत झाली. त्यामध्ये गावपातळीवरील राजकारणाची झलक पाहायला मिळाली. या चुरशीच्या लढतीत रामचंद्र पाटील व अ‍ॅड. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ११ पैकी ७ जागा जिंकत अनेक वर्षांपासूनची सत्ता अबाधित ठेवली; तर विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला जागा जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर सरपंच निवडीपर्यंत गावात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींत अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या अ‍ॅड. नरेंद्र पाटील यांनी सरपंचपद ‘ओपन’ असूनही महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला. पदाची संधी सर्वांना मिळावी म्हणून ग्रामविकास पॅनेलच्याच शोभा नलवडे सरपंच, तर शंकर झिमरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

नांदलापूर ग्रामपंचायतीत नऊ सदस्यसंख्या असून त्यापैकी गोपाळवस्तीतील एक महिला बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित आठ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला बगल देत भावकी व गावपातळीवरील राजकारणाला प्राधान्य दिले. विलास शिर्के, मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के या माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. आठ जागांपैकी विलास शिर्के यांना ३, मानसिंग लावंड यांना ३ व प्रदीप शिर्के यांना २ जागांवर विजय संपादन करता आला. साधारणत: नांदलापुरात मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के हे उंडाळकर व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे आहेत; तर विलास शिर्के यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले हे डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचे आहेत. नांदलापूरचे सरपंचपद हे अनुसूचित जाती पुरुषासाठी आरक्षित आहे. मात्र निवडून आलेल्यांमध्ये या प्रवर्गातील कोणीही नसल्यामुळे पद रिक्तच राहिले; तर उपसरपंच म्हणून आमदार चव्हाण गटाचे मानसिंग लावंड यांची निवड झाली आहे.

- चौकट

गोळेश्वरमध्ये चंद्रकांत काशीद सरपंच

गोळेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय पातळी बाजूला ठेवत गावपातळीवर भावकी व वाडीवस्तीवर आधारित निवडणूक झाली. सोयीनुसार एकत्र येऊन शिवशंभो ग्रामविकास पॅनेलचे चंद्रकांत काशीद सरपंच, तर प्रकाश जाधव यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.