शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

परवानगीने आले : महिन्यात एक लाखजणांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:30 PM

यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

ठळक मुद्देमुंबई, ठाणे अन् रायगडमधून ६६ हजारजण गावी; अनेकजण परतू लागले

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विविध ठिकाणी असलेले लोक आपापल्या गावी परतु लागले आहेत. गेल्या सव्वा महिन्याच्या काळात देशातून १ लाख ९ हजार जणांची सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी घरवापसी झाली आहे. हे सर्वजण परवाना व तपासणी नाक्यावरून आलेले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक ६६ हजारजणांनी गाव जवळ केले आहे.

कोरोना विषाणूमुळे देशातच २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली. शासन नियम पाळावे लागेल. तर कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, व्यवसायही थांबले. परिणामी लोकांना घरातच थांबून राहावे लागले. अशातच सातारा जिल्ह्यातून इतर राज्यात नोकरी, व्यवसायासाठी गेलेले. तसेच महाराष्ट्रातही नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकांना गावी परतण्याचे वेध लागले होते. कारण कोरोनामुळे दूरगावी किती राहायचे, असा प्रश्न होता. यातून अनेकांनी घर जवळ केले; पण बहुतांशजणांना घरवापसी करता आली नाही. मात्र, शासनाने परवानगी दिल्याने अनेकजण आता जिल्ह्यात येऊ लागले आहेत.

१८ एप्रिलपासून २४ मेपर्यंत १ लाख ९ हजार ६०४ जणांनी सातारा जिल्ह्यात घरवापसी केली आहे. ई-पास आणि चेक पोस्टवरून हे सर्वजण आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

राज्याचा विचार करता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून ६५ हजार ७९५ जण सातारा जिल्ह्यात आले आहेत. यामध्ये

मुंबईतून २८ हजार ९१३, ठाणे १९ हजार ७६ आणि रायगडमधील १७ हजार ८०६जणांचा समावेश आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून ११ हजार १३७, सांगलीतून ५ हजार ४१९, कोल्हापूरमधून ३ हजार ३५ जण आले आहेत. अशाप्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या साताºयातील लोकांनी घरवापसी केली आहे. यापुढेही अनेकजण येणार आहेत. त्यामुळे हा आकडा वाढतच जाणार आहे.

सातारा तालुक्यात २० हजारजण आलेकोरोनामुळे बाहेरून सातारा जिल्ह्यात १ लाख ९ हजार जणांनी घरवापसी केली आहे. यामधील २० हजार ३१४ जण हे सातारा शहर व तालुक्यात आले आहेत. तर कºहाड तालुक्यात १२ हजार ६१७, पाटण १२ हजार ४६३, खटाव ११ हजार ६७६, माण तालुक्यात १० हजार ३४१ जण आले आहेत. तसेच वाई तालुक्यात ८ हजार ९८५, जावळी ८ हजार १९२, फलटण ७ हजार ४५७, महाबळेश्वर ६ हजार ५८८, कोरेगाव ६ हजार ११३ आणि खंडाळा तालुक्यात ४ हजार ८९४ जण आले आहेत.

प्रशासनाचे आवाहनसातारा जिल्ह्यात अधिकृतरीत्या १ लाख ९ हजारजण आले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावी आहेत; पण बाहेरून आलेल्यांनी स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. होम क्वॉरंटाईन व्हावे. आरोग्याबाबत काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीय