दुर्दैवी घटना! चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:50 IST2022-04-22T13:50:03+5:302022-04-22T13:50:24+5:30
सातारा : चक्कर येऊन बेशुध्द पडल्याने सातारा शहरातील एकाचा मृत्यू झाला. पांडुरंग गणपत जगदाळे (वय ३६, गोडोली, सातारा) असे ...

दुर्दैवी घटना! चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू, साताऱ्यातील घटना
सातारा : चक्कर येऊन बेशुध्द पडल्याने सातारा शहरातील एकाचा मृत्यू झाला. पांडुरंग गणपत जगदाळे (वय ३६, गोडोली, सातारा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडुरंग जगदाळे यांना घरातच छातीत दुखू लागले होते. त्यानंतर ते चक्कर येऊन बेशुध्द पडले. त्यांना दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. काल, गुरुवारी(दि.२१) हा प्रकार घडला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.