Satara News: पुनवडी बसथांब्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 14:01 IST2022-05-27T13:59:49+5:302022-05-27T14:01:28+5:30
पोलीस आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.

Satara News: पुनवडी बसथांब्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या
सातारा : सातारा तालुक्यातील पुनवडी येथील बसथांब्याच्या शेडमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंद्रकांत बंडू मनवे (वय ४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुनवडी येथील चंद्रकांत मनवे यांनी बसथांब्याच्या शेडमधील लोखंडी पाईपला नॉयलाईनची दोरी बांधून गळफास घेतला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांत बाबूराव मनवे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.