Satara: जुन्या भांडणातून एकास टिकावाच्या दांडक्याने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

By नितीन काळेल | Updated: October 13, 2023 12:44 IST2023-10-13T12:43:31+5:302023-10-13T12:44:07+5:30

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणावरुन एकाला रस्त्यात अडवून टिकावाच्या दांडक्याने डोक्यात मारहाण करण्यात आली. तसेच मोठी दगडे मारण्यात आली. ...

One beaten up with a stick due to an old feud in Satara | Satara: जुन्या भांडणातून एकास टिकावाच्या दांडक्याने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

Satara: जुन्या भांडणातून एकास टिकावाच्या दांडक्याने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणावरुन एकाला रस्त्यात अडवून टिकावाच्या दांडक्याने डोक्यात मारहाण करण्यात आली. तसेच मोठी दगडे मारण्यात आली. याप्रकरणी अंबवडे खुर्दच्या दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सदाशिव नामदेव गुजर (रा. अंबवडे खुर्द, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अजय राजाराम माने आणि अमित आनंदराव माने (दोघेही रा. अंबवडे खुर्द) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. काल, गुरुवारी (दि. १२) अंबवडे खुर्द गावच्या हद्दीतील तीनकोणा नावाच्या शिवारातील रस्त्यावर हा प्रकार घडला. 

तक्रादार यांचे भाऊ किशोर गुजर हे मुलांना शाळेत सोडून परत घरी येत होते. त्यावेळी संशयितांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तसेच कोणी जवळ नसल्याचे पाहून किशोर गुजर यांना रस्त्यात अडवून टिकावाच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावर मोठी दगडे टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये किशोर गुजर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

Web Title: One beaten up with a stick due to an old feud in Satara