सोमर्डीत वाळू चोरीप्रकरणी एकाला पकडले : सव्वालाखाची वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:40 IST2019-11-13T21:38:54+5:302019-11-13T21:40:18+5:30

या खबरीवर तपास करत कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाळू घेऊन जात असतानाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता विनापरवाना वाळू उपसा व वाळू चोरीप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

One arrested for sand theft in Somerset: Theft of all-purpose sand | सोमर्डीत वाळू चोरीप्रकरणी एकाला पकडले : सव्वालाखाची वाळू चोरी

सोमर्डीत वाळू चोरीप्रकरणी एकाला पकडले : सव्वालाखाची वाळू चोरी

ठळक मुद्देमेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सायगाव : सोमर्डी, ता. जावळी या गावच्या हद्दीमध्ये १ लाख १३ हजार ५०० रुपये किमतीची वाळू चोरी करत असताना उमेश प्रतापराव परामणे (वय ४१ रा. सोमर्डी) व हृषीकेश अंकुश मंजुळकर (२१, रा. सोमर्डी) यांच्याविरोधात मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सोमर्डी गावच्या हद्दीत कुडाळ-पाचगणी मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र्रापासून काही अंतरावर ट्रॅक्टरच्या सा'ाने वाळू चोरी करून नेत असतानाची खबर कुडाळ पोलिसांना अज्ञात खबऱ्याने दिली. या खबरीवर तपास करत कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाळू घेऊन जात असतानाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता विनापरवाना वाळू उपसा व वाळू चोरीप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, हवालदार बाबर अधिक तपास करत आहेत.

कुडाळी नदीवर वाळू चोरांची टोळीच कार्यरत
कुडाळी नदीवर हुमगाव ते कुडाळ पूलदरम्यान अनेकजण रात्रीच्यावेळी अवैध उत्खनन करून वाळूउपसा करताना आढळतात. सर्जापूर गावाजवळ देखील एकजण गावकऱ्यांना दम देऊन नदीपात्रात अवैध उत्खनन करीत आहे. या कुडाळी नदीवर अनेक अवैध वाळू उपसा करणाºया टोळ्याच कार्यरत आहेत. या टोळ्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

 

Web Title: One arrested for sand theft in Somerset: Theft of all-purpose sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.