व्याहळी-पुनर्वसन येथे वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST2021-08-24T04:43:33+5:302021-08-24T04:43:33+5:30

वाई व्याहळी-पुनर्वसन गावांच्या हद्दीत असणाऱ्या परिसरातील विहिरीत राजेंद्र शंकर व्याहळीकर (वय ५५) यांचा बुडून मृत्यू ...

An old man drowned in a well at Vahli-Rehabilitation | व्याहळी-पुनर्वसन येथे वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

व्याहळी-पुनर्वसन येथे वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

वाई

व्याहळी-पुनर्वसन गावांच्या हद्दीत असणाऱ्या परिसरातील विहिरीत राजेंद्र शंकर व्याहळीकर (वय ५५) यांचा बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद मुलगा संदीप राजेंद्र व्याहळीकर यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.

वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि. २१ ऑगस्ट) राजेंद्र व्याहळीकर हे सकाळी साडेअकरा वाजता घरात दारूच्या नशेत काही न सांगता निघून गेले. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्याने रविवारी (दि. २२) वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सोमवारी (दि. २३) व्याहळी-पुनर्वसन गावातील संदीप व्याहळीकर यांच्या घराच्या पाठीमागील परिसरातील निकम यांच्या विहिरीत दुपारी अडीचच्या सुमारास मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मुलगा संदीप यांनी जाऊन खात्री केली असता मृतदेह राजेंद्र व्याहळीकर यांचा असल्याची खात्री झाली. राजेंद्र व्याहळीकर यांना पोहायला येत नव्हते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.

Web Title: An old man drowned in a well at Vahli-Rehabilitation