शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज माघारीसाठी उमेदवारांना लाखोंची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा ...

रहिमतपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज माघारी घेण्यासाठी विरोधी पॅनेलकडून उमेदवारांना लाखोंची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांचा भाव वधारला असला तरी, जनमताच्या पाठबळावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून लाखोंची ऑफर धुडकावून निवडणुकीच्या मैदानात थेट सामना करण्याचे खुले आव्हान दिले जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील वाठार, किरोली, तारगाव, साप, धामणेर, सायगाव, सासुर्वे, सुर्ली, रिकिबदारवाडी, दुर्गवाडी, काळोशी आदी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याचा कालावधी सोमवारी दुपारी तीन वाजता संपला. तत्पूर्वी दोन दिवस काही गावांतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जात होती. यामध्ये अगदी एक ते दीड लाख रुपये देतो व सोसायटीध्ये पाच वर्षे चेअरमन करतो, आदी ऑफरचा समावेश आहे. आपल्या वॉर्डामधील मतदारांचे पाठबळ असलेल्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला, तर आपला मार्ग सुकर होईल, या आशेने आणि लढत झाली तर आपला पराभव अटळ आहे, या भीतीने काही जणांकडून या उचापती केल्या जात होत्या. परंतु कुठल्याही ऑफरला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे लढतीला सामोरे जाण्याच्या तयारीमुळे, भानगडी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही जणांकडून विरोधी उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. यासाठी उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्याची नोकरी घालविण्याची भीती दाखवली जात होती. मात्र, संबंधित उमेदवारानेही नोकरी घालविण्याची भीती दाखवणाऱ्याच्या वरती आपली पोहोच असल्याचे दाखवून दिल्याने, भानगडखोरीला चांगलाच लगाम बसला आहे. शेरास सव्वाशेर भेटल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या आणि दारुण होणारा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने जनमत नसलेल्या उचापती करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत योग्य उमेदवाराच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहते. मतासाठी जेवणावळी व आमिष दाखविण्याची गरज त्यांनाच पडते, ज्यांच्यामागे जनमत नाही. जेवणावळी घालणाऱ्यांना जनता कधीच पाठबळ देत नाही, याचा प्रत्यय अनेक निवडणुकीत जेवणावळी घालून निवडणुका जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आलेला आहे. तरीही निवडणुका आल्या की अंगात येणाऱ्यांच्या गमती जमती पाहून मतदारांसह ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या उचापतखोरांच्या भानगडींची चर्चा गावातील पारावर व चौका-चौकात चांगलीच रंग रंगत आहे.

(ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान असा लोगो वापरावा