साताऱ्यात ऊसतोड मजुराच्या तेरा वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य, संशयितावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:15 IST2022-03-30T16:03:12+5:302022-03-30T16:15:08+5:30

पोलिसांनी संबंधितावर तातडीने गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपी मुलगी राहात असलेल्या त्याच गावातील असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Obscene act with a thirteen year old girl in Satara, Charge filed against the suspect | साताऱ्यात ऊसतोड मजुराच्या तेरा वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य, संशयितावर गुन्हा दाखल

साताऱ्यात ऊसतोड मजुराच्या तेरा वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य, संशयितावर गुन्हा दाखल

सातारा: एका तेरा वर्षांच्या मुलीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संबंधितावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावामध्ये जालना येथील ऊसतोड मजूर कामासाठी आले आहेत.  एका मजुराची तेरा वर्षांची मुलगी गावातील हापशीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी संबंधित आरोपीने त्या मुलीचा पाठलाग हापशीपासून ती राहात असलेल्या कोप्यापर्यंत केला. कोपीवर गेल्यानंतर मुलीचा हात धरून तीझ्यासोबत अश्लील कृत्य केले.

हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितावर तातडीने गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपी मुलगी राहात असलेल्या त्याच गावातील असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक एस.जी. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Obscene act with a thirteen year old girl in Satara, Charge filed against the suspect