राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल
By दीपक शिंदे | Updated: August 21, 2024 13:21 IST2024-08-21T13:20:18+5:302024-08-21T13:21:41+5:30
सातारा : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार ...

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल
सातारा : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आदी उपस्थित होते.
नितीन पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. त्याबरोबरच माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि वाई - महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार दौऱ्यात अजित पवार यांनी वाईतील मतदारांना नितीन पाटील यांना खासदार करणार म्हणून शब्द दिला होता. त्या शब्दाला जागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. तर आज पक्षाचे नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात आला.