नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,युवकाला जमावाकडून चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:05 IST2019-11-07T16:03:53+5:302019-11-07T16:05:05+5:30

नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून जमावाने संजय उर्फ बुटक्या अशोक जाधव (वय २२, रा. जकातवाडी, ता. सातारा) याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सातारा तालुक्यातील एका गावामध्ये घडली.

Nine-year-old Chimukkali persecuted, youth silenced by mob | नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,युवकाला जमावाकडून चोप

नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,युवकाला जमावाकडून चोप

ठळक मुद्देनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,युवकाला जमावाकडून चोपसातारा तालुक्यातील एका गावातील घटना

सातारा : नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून जमावाने संजय उर्फ बुटक्या अशोक जाधव (वय २२, रा. जकातवाडी, ता. सातारा) याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सातारा तालुक्यातील एका गावामध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना दुपारच्या सुमारास संजय जाधव याने मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर जमावाने संजयला बेदम चोप दिला.

त्यानंतर सातारा तालुका पोलिसांच्या त्याला ताब्यात देण्यात आले. हा प्रकार सातारा तालुक्यातील एका गावामध्ये सुमारे तीन दिवसांपूर्वी घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Nine-year-old Chimukkali persecuted, youth silenced by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.