शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी विद्युत दाहिनीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. लाकडांऐवजी विद्युत दाहिनी अथवा शेणीचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल टिकून राहील. त्यामुळे प्रशासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधूून होत आहे.

जिल्ह्यात रस्ते विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल झाली आणि अजूनही सुरू आहे. या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो वर्षांपासूनची झाडे क्षणार्धात जमीनदोस्त झाली. निश्चित दळणवळण सुधारण्यासाठी रस्ते होणे जेवढे आवश्यक आहे, तेवढाच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण होणे काळाची गरज बनली आहे. रस्ते विकास करताना जेवढी झाडे तोडली तेवढे वृक्षारोपण होणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही.

सध्या घरोघरी गॅस कनेक्शन असल्याने वृक्षतोड काही प्रमाणात थांबली. वडूजमध्ये कोरोना महामारीच्या काळात ३३४ कोरोना बाधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी अकरा मण लाकूड व पाच ते सात लीटर डिझेलसाठी सुमारे चार हजार रुपये खर्च येतो. हे प्रमाण पाहता आजवर हजारो टन लाकूड केवळ अंत्यसंस्कारासाठीच वापरण्यात आले आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल मात्र ढासळत चालला आहे.

अंत्यविधीसाठी इलेक्ट्रिक दाहिनी अथवा शेणीचा वापर व्हावा, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील शेणीच्या माध्यमातून शेतीपूरक जोड व्यवसाय सुरू करता येईल. ‘एकपाटी शेणखताला तर एकपाटी शेणीला’ असा दुहेरी फायदा बळीराजाचा होऊ शकतो आणि प्रसंगी वृक्षतोडही थांबेल. यासाठी मानसिकतेत बदल होणे ही काळाची गरज आहे.

फोटो : १७ केशव जाधव

वडूज येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकूड व डिझेलचा वापर केला जात आहे. (शेखर जाधव )