शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे वर्चस्व; काँग्रेसचाही सूचक इशारा

By admin | Updated: August 7, 2015 22:19 IST

फलटण तालुका : ग्रामपंचायत निवडणूक; विरोधकांची दुही, राजे गटासाठी फायदेशीर--ग्रामपंचायत विश्लेषण

नसीर शिकलगार - फलटण तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात बहुसंख्य ग्रामपंचायती आल्या आहेत. विरोधी काँग्रेसनेही अनपेक्षितपणे अनेक ग्रामपंचायतींत शिरकाव करून आपल्याला कमी लेखू नका, असा एक प्रकारचा इशारा दिल्याचे मानले जाते आहे.फलटण तालुक्यात अनेक पक्ष व नेतेमंडळी कार्यरत आहेत. मात्र, राजकीय वातावरण राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याभोवतीच फिरताना दिसते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता फलटण तालुक्यावर आहे. २५ वर्षांपासूनच्या सत्तेला विरोधकांनी अनेकवेळा छेद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांच्या दुहीमुळे तो शक्य झालेला नाही.काँग्रेस पक्ष तालुक्यात गटाअंतर्गत विखुरला गेला आहे. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील, ज्येष्ठ नेते सुभाषराव बेडके यांच्यात काँग्रेस विभागली गेली आहे. सध्या सुरू असलेल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून विरोधकांनी अंग काढून घेतले. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विरोधक किती तग धरतील, अशा चर्चा रंगल्या असताना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर व प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी धूर्तपद्धतीने अनेक गावांत पॅनेल उभे केले.कार्यकर्त्यांना ताकद दिली. याचा परिणाम अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसून आला. अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींत रणजितसिंह व प्रल्हादराव पाटील यांनी सत्ता खेचून आणली. तालुक्यात प्रभावी विरोधाची भूमिका काँग्रेस पक्ष बजावू शकतो, हे त्यांनी दाखवून दिल्याचे चर्चिले जात आहे.रामराजे नाईक-निंबाळकर यांचे स्वीय सहायक असलेले मुकुंद रणवरे यांची निंभोरे ग्रामपंचायतीत अनेक वर्षांपासूनची सत्ता होती. या निवडणुकीत रणजितसिंहांनी मोठ्या चातुर्याने ही ग्रामपंचायत खेचून आणताना परिवर्तन घडविले आहे. साखरवाडी ग्रामपंचायत तर तालुक्यात प्रतिष्ठेची झाली होती. राजे गटातून तर एकजण सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मोठेपणाने सरपंचपदाचा त्यांनी तालुक्यात आव आणल्याने त्याच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, ग्रामस्थांनी व खुद्द राजेगटातील अंतर्गत विरोधकांनी सपशेल त्यांना तोंडघशी पाडल्याने साखरवाडीत आता राजेगटात सरपंचपदासाठी चुरस वाढली आहे. साखरवाडी ग्रामपंचायतीमधील सत्ता का गेली? याचे आत्मचिंतन प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांना करावे लागणार आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी सत्तेवर असलेली भाजपा-शिवसेना कार्यकर्ते योग्य नेतृत्वाअभावी तालुक्यात अद्याप शांतच दिसत आहेत.अनेक गावातील परिवर्तन नेतेमंडळींना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. आता सर्वाचे लक्ष सरपंचपदाच्या निवडीकडे लागले आहे.कोळकी राजे गटाकडेचराजकीयदृष्ट्या जागृत असलेली कोळकी ग्रामपंचायत राजे गटाने पुन्हा आपल्या ताब्यात ठेवली आहे. तेथे एक उमेदवार एक मताने तर दुसरा उमेदवार तीन मतांने निवडून आला आहे. तालुक्यात ७८ पैकी ६८ ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा राजे गटाने तर १८ ग्रामपंचायती आम्ही मिळविल्याचा दावा विरोधी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांचा झालेला शिरकाव दुर्लक्ष करण्याजोगा नाही. जावली ग्रामपंचायतीवर ‘रासप’चे वर्चस्वजावली : जावली, ता. फलटण येथील २०१५-२० या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने सर्वच्या सर्व नऊ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पाच उमेदवार अशी तिरंगी लढत झाली.गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा तर ‘रासप’ने तीन जागा मिळवल्या होत्या. यंदा काशिनाथ शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवून राष्ट्रवादीला धोबीपछाड देत सर्व जागांवर विजय मिळविला. या तून गावामध्ये जास्तीत जास्त सुविधा उपबल्ध करून देण्याबरोबरच गावातील अडचणी सोडवणार असल्याचे शेवते यांनी सांगितले. निवडून आलेले उमेदवार गजराबाई मदने, लता चवरे, बाळू पोकळे, काशिनाथ शेवते, रंजना पडर, सुरेखा नाळे, सुनील गायकवाड, नंदा आवटे, धनाजी नाळे असे आहेत.