शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: ‘घड्याळा’ला ‘तुतारी’ची साथ; जिल्ह्यात राष्ट्रवादी सुसाट !

By सचिन काकडे | Updated: February 11, 2026 16:59 IST

भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले : दोन्ही राष्ट्रवादींची एकी पथ्यावर

सचिन काकडेसातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर गेल्या काही काळापासून भाजपचे वाढते वर्चस्व आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे निर्माण झालेली मरगळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाने पूर्णपणे झटकून टाकली. राष्ट्रवादी संपली अशी टीका करणाऱ्या विरोधकांना साताऱ्याच्या मातीने नवा धडा शिकवला. सत्तेत एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी एकत्र आल्या. भाजपने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत सर्वशक्तीनिशी चढवलेला हल्ला दोन्ही राष्ट्रवादींच्या अभेद्य युतीने परतवून लावला. परिणामी, जिल्ह्यात भाजपची स्वबळाची घोडदौड रोखण्यात राष्ट्रवादीच्या रणनीतीला यश तर आलेच शिवाय या निकालाने दोन्ही राष्ट्रवादींना उभारीदेखील मिळाली.'तुतारी’मुळेच ‘घड्याळ’ सुसाट!साताऱ्याच्या राजकारणात हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. अधिकृतपणे राष्ट्रवादी हे दोन पक्ष असले तरी, कार्यकर्त्यांच्या पातळीवर ‘पवार’ हा एकच विचार प्रभावी ठरला. जिथे तुतारीचा उमेदवार नव्हता, तिथे शरद पवारप्रेमी मतदारांनी एकगठ्ठा मतदान अजित पवार गटाच्या उमेदवाराला केले. जरी तुतारीचे उमेदवार प्रत्यक्ष निवडून आले नसले, तरी त्यांच्या पाठिंब्यामुळेच घड्याळाचे काटे वेगाने फिरले आणि भाजपची सत्तेची गणिते विस्कळीत झाली.

कराड उत्तरची ‘ती’ खंत कायम...कराड उत्तरमध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी पालिकेत सत्ता आणली असली, तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ‘तुतारी’चा आवाज हवा तसा घुमला नाही. येथे शरद पवार गटाची रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना फायदेशीर ठरली. मात्र, स्वतःच्या चिन्हावर उमेदवार निवडून न येण्यामागे काही गुलदस्त्यातील ‘राजकीय तडजोडी’ असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे...१. नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या धुंदीत भाजपने स्वबळाचा नारा दिला. मात्र, जिल्हा परिषदेत त्यांना शिंदेसेनेसह दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीचा मोठा फटका बसला.२. शरद पवार गटाने स्वतःचे उमेदवार कमी देऊन अजित पवार गटाच्या उमेदवारांना ताकद दिली. तुतारीने वाजवलेल्या सुरावर घड्याळाने अचूक वेळ साधत ६५ पैकी २० गटांवर कब्जा मिळविला.३. केवळ दोन्ही राष्ट्रवादीच नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी झाली.

एकूण गट : ६५

  • राष्ट्रवादी (अजित पवार) २०
  • एकूण गण : १३०
  • राष्ट्रवादी (अजित पवार) ४३
  • राष्ट्रवादी (शरद पवार) ०३
English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: NCP alliance triumphs, halts BJP's advance in district.

Web Summary : NCP alliance halted BJP in Satara ZP polls. Pawar's influence unified factions, benefiting Ajit Pawar's candidates. Strategic alliance proved successful, revitalizing NCP.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलMakarand Patilमकरंद पाटीलShashikant Shindeशशिकांत शिंदे