शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दगडगोट्यांवर रेखाटल्या निसर्गछटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST

नितीन काळेल कला माणसाला मोठी करते. अशाचप्रकारे साताऱ्यातील श्वेता हसबनीस-जंगम यांनी कोरोनातील लॉकडाऊनदरम्यान वेळ जावा म्हणून घरी जमविलेल्या विविध ...

नितीन काळेल

कला माणसाला मोठी करते. अशाचप्रकारे साताऱ्यातील श्वेता हसबनीस-जंगम यांनी कोरोनातील लॉकडाऊनदरम्यान वेळ जावा म्हणून घरी जमविलेल्या विविध प्रकारच्या दगडांवर पेंटिंग (स्टोन पेंटिंग) केले. त्यावर निसर्गाची छायाचित्रे रेखाटली. आता हेच स्टोन पेंटिंग त्या संक्रांतीला वाण म्हणून देणार आहेत. लोकांनी निसर्गाच्या जवळ जावे म्हणूनच श्वेता या पेंटिंगचे वाण महिलांना देणार आहेत.

कला माणसाला अमर करते. कला असणारा माणूस कधीच एकटा नसतो. म्हणूनच, माणसाकडे एखादीतरी कला असावी असे म्हणतात. अशाचप्रकारे एक म्हणजे साताऱ्यातील संगमनगर येथे राहणाऱ्या श्वेता हसबनीस-जंगम. श्वेता या डॉईंगच्या क्लासेस घेतात. त्यांचे वडीलही चित्रकलेचे प्राध्यापक होते. त्यामुळे घरातूनच श्वेता यांना कलेचे महत्त्व समजले. तर सासरी पती अनिश जंगम हे अ‍ॅडव्हरटाईजींग एजन्सी पाहतात. त्यामुळे माहेर आणि सासरीही कलायुक्त जीवन. कलेची आवड असणाऱ्या श्वेता या बाहेर कोठेही गेल्या की वेगवेगळ्या प्रकारचे दगड जमा करून घरी आणत. साताऱ्याजवळील संगम माहुली, म्हसवे या परिसरात असणाऱ्या नदीपात्रातून अनेक दगड-गोटे त्यांनी जमा केले होते.

कोरोनाच्या काळात सुरुवातीला लॉकडाऊन जाहीर झाला होता. त्यामुळे ड्रॉईंगचे क्लासेस बंद ठेवावे लागले. लॉकडाऊन असल्याने बाहेर पडताही येत नव्हते. अशावेळी श्वेता यांच्या कलेला आणखी बळ मिळाले. त्यातच मुलालाही बाहेर जाऊन खेळता येत नव्हते. परिणामी वेळ घालविण्यासाठी श्वेता यांनी जमा केलेल्या दगड-गोट्यांवर चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. साडेचार वर्षांच्या असणाऱ्या रिशानच्या हातातही प्रथमच कलर आणि ब्रश आला. तर श्वेताच्या आई स्नेहा हसबनीस याही या कलेत रमून गेल्या. त्यामुळे तिघांनीही जमा केलेल्या दगड-गोट्यांवर चित्रे रेखाटली. त्याचबरोबर पाना-फुलांच्या चित्रांनाचाही सुबकपणे वापर केला. यासाठी अ‍ॅकॅ्रलिक कलर वापरला. यामुळे पाणी पडले तरी पेंटिंग पुसून जात नाही. हा रंग बराचकाळ टिकून राहतो.

आता मकर संक्रांतीला श्वेता या स्टोन पेंटिंगच वाण म्हणून महिलांना देणार आहेत. हे पेंटिंग पेपर वेट, शोपिस म्हणून घरात राहीलच. त्याशिवाय घरासमोरील झाडांच्या कुंडीत पेंटिंग केलेले दगड सुंदरतेत भर घालणार आहेत. तसेच त्यावर पाने, फुले, झाडांचे नक्षीकाम रेखाटल्याने निसर्गाची अनुभूती मिळून पर्यायाने लोकही निसर्गाकडे ओढले जाणार आहेत. अशीच या स्टोन पेंटिंगमागची कल्पना आहे.

कोट :

मकर संक्रांतीला प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण देऊन आपण पर्यावरणाची हानी करतो. हे टाळण्यासाठी संक्रांतीला स्टोन पेंटिंग देण्याचा निश्चय केला आहे. कारण, कोरोना लॉकडाऊन काळात विविध आकाराच्या स्टोनवर पेंटिंग केले आहे. हे पेंटिग निसर्गाच्या जवळ जाणारे आहे. पेपरवेट, शोपिस म्हणूनच याचा वापर होईल. तसेच बागेचीही शोभा वाढणार आहे. यामुळे नागरिक आणखी निसर्गाच्या जवळ जातील.

- श्वेता हसबनीस-जंगम

..........................................................