शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाच्या नावावर गंडा घालणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : बाराजणांनी दिली तक्रार

सातारा : पर्यटनाच्या नावावर अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘हॅप्पी एक्सफ्लोझर टूर’ या कंपनीचा जयदीप श्रीरंग काशीकर (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाला वाचा फोडल्याने अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. ‘पर्यटनाच्या नावावर लाखोंचा गंडा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. १८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या कंपनीने साताऱ्यातील पर्यटकांशी कशा पद्धतीने फसवूणक केली आहे. याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला होता. कंपनीने खास दिवाळीसाठी विविध आॅफर देऊन पर्यटकांना आकर्षिक करून घेतले होते. त्यामुळे अनेकांनी या कंपनीमध्ये फिरण्यास जाण्यासाठी बुकिंगही करून ठेवले होते. कंपनीचे कार्यालयात येथील मंगळवार पेठेत आहे. काशीकरने दिवाळी पाडव्यादिवशी काही लोकांना बोलावून त्यांच्या ताब्यात त्यांची कागदपत्रे, विमानाची तिकिटे, सहलीविषयीची पूर्ण माहिती, टूर मॅनेजरचा मोबाईल क्रमांक आदी सर्व गोष्टी ताब्यात दिल्या होत्या. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याच रात्री ‘उद्या किती वाजता निघायचे,’ याच्या चौकशीसाठी काहीजण काशीकरला फोन करू लागले; मात्र काशीकरचा फोन बंद झाला. भाऊबीजेदिवशी काहींनी पहाटेच्या सुमारास काशीकरचे आॅफिस गाठले तर त्याला टाळा होता. काहींनी चौकशी करून घर शोधले तर ज्या फ्लॅटमध्ये तो राहत होता. त्या फ्लॅटलाही कुलूप होते. ट्रिपच्या आदल्या दिवशीच काशीकर गाशा गुंडाळून गायब झाल्याचे नागरिकांना समजले. त्याने दिलेली तिकिटे आणि कागदपत्रे सर्व बोगस असल्याचे पुढे आले. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारांकडे असलेली कागदपत्रांची शहानिशा केली. त्यानंतर काशीकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. लक्ष्मण सदाशिव पवार (रा. शाहूपुरी) यांच्यासह बाराजणांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक झालेले आणखी काही तक्रारदार पोलिसांकडे आले असून, तक्रारदारांकडे असलेली कागदपत्रे पोलीस तपासत आहेत. त्यामुळे तक्रारदारांची संख्या आणखी वाढणार आहे. (प्रतिनिधी)